Latur: पेपर एक, प्रश्नपत्रिका दुसरीच! अहमदपूरमध्ये उर्दूच्या २१ विद्यार्थ्यांना मनस्ताप

By आशपाक पठाण | Updated: March 1, 2025 22:30 IST2025-03-01T22:27:56+5:302025-03-01T22:30:00+5:30

Latur News: दहावी बाेर्ड परीक्षेचा शनिवारी इंग्रजीचा पेपर होता. अहमदपूरच्या विमलबाई देशमुख प्रशाला केंद्रात उर्दू माध्यमाच्या २१ विद्यार्थ्यांना इंग्रजी (१७) या विषयाची प्रश्नपत्रिका देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजी (३) ची प्रश्नपत्रिका देण्यात आली

Latur: Paper one, question paper another! 21 Urdu students suffer in Ahmedpur | Latur: पेपर एक, प्रश्नपत्रिका दुसरीच! अहमदपूरमध्ये उर्दूच्या २१ विद्यार्थ्यांना मनस्ताप

Latur: पेपर एक, प्रश्नपत्रिका दुसरीच! अहमदपूरमध्ये उर्दूच्या २१ विद्यार्थ्यांना मनस्ताप

- आशपाक पठाण 
अहमदपूर (जि. लातूर) - दहावी बाेर्ड परीक्षेचा शनिवारी इंग्रजीचा पेपर होता. अहमदपूरच्या विमलबाई देशमुख प्रशाला केंद्रात उर्दू माध्यमाच्या २१ विद्यार्थ्यांना इंग्रजी (१७) या विषयाची प्रश्नपत्रिका देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजी (३) ची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा आमचा पेपर नाही, असे सांगितल्यावरही कोणी ऐकून घेईना. उलट विद्यार्थ्यांनाच चुकीची प्रश्नपत्रिका देऊन तीच सोडविण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर परीक्षार्थींनी या प्रश्नपत्रिकेवर आक्षेप घेत हा आमच्या विषयाचा पेपर नाही, असे सांगूनसुद्धा पर्यवेक्षकांनी हीच तुमची कृती पत्रिका आहे, असे म्हणून तीन तास या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा इंग्रजीतील (३) ची कृती पत्रिका लिहिण्यास भाग पाडले. शिक्षण विभागाच्या सावळ्या गाेंधळामुळे परीक्षार्थी संभ्रमात पडले. सदर चूक केंद्राच्या निदर्शनास आणूनसुद्धा कोणी दखल घेतली नसल्याचा आरोप शादुल्ला पठाण, फातेमा पठाण, नाजिया पठाण, जुबेर पठाण, उमेद पठाण, मोहनूर पठाण, तमन्ना पठाण, उम्मेफलक पठाण, जुनेद पठाण, तनजीला पठाण, सदफ पठाण, अ. बारो पठाण, नगमा पठाण, लईबा पठाण, वाजीद पठाण, तनवीर पठाण, वसीम पठाण, महेक पठाण, सालेहा पठाण, अनम पटेल, नर्गीस पठाण या विद्यार्थ्यांनी केला आहे.

मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे...
विमलबाई देशमुख प्रशाला या परीक्षा केंद्रावर बोर्डाने योग्य ती कार्यवाही करून परीक्षार्तींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी एस.ए. जागीरदार माध्यमिक विद्यालय काळेगाव, मौलाना आझाद हायस्कूल अहमदपूर, सिराज उल उलूम गर्ल्स हायस्कूल अहमदपूर, उस्मानिया उर्दू हायस्कूल अहमदपूर या शाळांच्या मुख्याध्यापकांनी अहमदपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अनवधानाने चुकीचे पेपर वाटले...
स्टिकरच्या कलरवरून आणि लिपिक नवीन असल्यामुळे अनवधानाने चुकीने पेपर वाटप करण्यात आले. याविषयी मी बोर्डाकडे प्राथमिक माहिती कळवली असून, तसा पत्रव्यवहार करणार आहे.
- एस. ए. कोयले, केंद्रप्रमुख 

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही...
याप्रकरणी बाेर्डाकडून चौकशी केली जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. शिक्षण विभागाच्या पथकाकडून केंद्राची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल. - सुधाकर तेलंग, विभागीय अध्यक्ष 

Web Title: Latur: Paper one, question paper another! 21 Urdu students suffer in Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.