अवैध व्यवसायावर लातूर पााेलिसांचे 'ड्रोन' स्ट्राईक !
By राजकुमार जोंधळे | Published: November 10, 2024 08:42 PM2024-11-10T20:42:33+5:302024-11-10T20:43:29+5:30
एकाच ठिकाणी उभे राहून केली टेहाळणी...
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यासील अवैध व्यवसायावरे लातूर पाेलिसांनी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्राेन स्ट्राईक केला आहे. या अनाेख्यवा कारवाईने जिल्ह्यातील अवैध व्यवाय करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.
लातूर जिल्हा पोलिसांनी अनेकदा अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली असून, गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र, या व्यवसायातील गुन्हेगार नवनवीन मार्ग, फंडा शाेधत अतिशय अडगळीच्या आणि दुर्गम भागात आपल्या हातभट्टीचा व्यवसाय थाटला आहे. ज्याठिकाणी पोलिसांना सहज पोहोचणे अवघड आहे. अडगळीच्या, झाडीत आणि डाेंगरदऱ्यातील हातभट्टी निर्मिती हाेणाऱ्या अड्ड्यांवर आता पाेलिसांनी ड्राेनद्वारे कारवाई कण्याचे नियाेजन केले आहे. या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी थेट आदेश दिले असून, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी गावठी, हातभट्टी निर्मितीचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी नामी शक्कल लढवलि आहे. या व्यवसायावर, ठिकाणांवर ‘ड्रोन स्ट्राईक’ करून पोलिसांनी हजाराे लिटर हातभट्टी, देशीचा साठा नष्ट केला आहे.
एकाच ठिकाणी उभे राहून केली टेहाळणी...
हातभट्टी निर्मिती करणाऱ्या ठिकाणी, अड्ड्यांवर एकाच ठिकाणी उभे राहून टेहाळणी करण्यासाठी पाेलिसांनी नवतंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. लातूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात, झाडाझुडपात सुरु असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांची ड्रोनच्या साह्याने व्हिडिओ आणि फुटेज घेत, त्याची खात्री करून हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ते अड्डे पाेलिसांच्या पथकाने उध्वस्त कले आहेत.
‘ड्राेन स्ट्राईक’ची कारवाई सुरुच राहणार...
लातूर जिल्ह्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी यापुढेही ड्रोन स्ट्राईकचं अनुकरण करण्यात येणार असून भविष्यात हा "ड्रोन स्ट्राईक" इतर कारवायांमध्ये ही वापरण्यात येणार आहे. ज्याद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आळवणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने अवैध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.