लातूर: तीन विद्यार्थ्यांवर शिक्षक तीन महिन्यांपासून करत होता अनैसर्गिक अत्याचार, मुख्याध्यापकही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:06 IST2025-04-01T15:04:27+5:302025-04-01T15:06:50+5:30
Latur Crime News: लातूरमधील एका शाळेत एक शिक्षक तीन विद्यार्थ्यांवर गेल्या तीन महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार करत होता. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

लातूर: तीन विद्यार्थ्यांवर शिक्षक तीन महिन्यांपासून करत होता अनैसर्गिक अत्याचार, मुख्याध्यापकही हादरले
Latur news: गेल्या तीन महिन्यांपासून एक शिक्षक शाळेतील तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लातूरमध्ये ही घटना घडली असून, नराधम शिक्षकाने तीनही विद्यार्थ्यांना धमकी दिली होती. आणि तो त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लातूर येथील एका शाळेत विद्यार्थी शिकायला आहेत. शिक्षक सोपान कळमकर(वय ४९) असे शिक्षकाचे नाव असून, शाळेवर कार्यरत आहे.
तीन विद्यार्थ्यांवर तीन महिन्यांपासून अत्याचार
नराधम शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना आपल्या वासनेची शिकार बनवले. त्याने विद्यार्थ्यांना धमकी दिली. गेल्या तीन महिन्यांपासून तो या तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार करत होता.
हेही वाचा >>"मराठी गया तेल लगाने...", सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज!
कळमकरकडून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे धाव घेतली. तिन्ही मुलांनी त्यांच्यासोबत शिक्षकाकडून केल्या जात असलेल्या कृत्याची कहाणी सांगितली. ते ऐकून मुख्याध्यापकही हादरले.
शिक्षकाची चौकशी अन्...
मुलांनी तक्रार केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. त्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीने शिक्षकाचीही चौकशी केली. यात नराधम शिक्षक सोपान याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले.
मुख्याध्यापकाने लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सोपान कळमकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.