Latur: घरफाेडीच्या गुन्ह्यातील तिघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या
By राजकुमार जोंधळे | Published: October 28, 2023 08:47 PM2023-10-28T20:47:13+5:302023-10-28T20:47:39+5:30
Crime News: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपुरातील सराफा व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी १७ ते १९ जूनच्या मध्यरात्री प्रवेश केला. सोन्याचे दागिने, एक पिस्टल चाेरुन नेल्याची घटना घडली. आराेपींच्या शाेधासाठी पाेलिस मागावर हाेते. दरम्यान, रेकॉर्डवरील अन् शेजारच्या जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांना ताब्यात घेत चाैकशी करण्यात आली. याबाबत पाेलिसांना खबऱ्याने माहिती दिली. यानुसार राम तुकाराम बने (२७), विजय अशोक कदम (दाेघे रा. गायकवाड कॉलनी, अहमदपूर) आणि केदारनाथ नामदेव गाडे (२९ रा. रुई ता. अहमदपूर) यांना २४ आक्टोबररोजी ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले १७ लाख ६६ हजारांचे सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पो.नि. सुधाकर देडे करीत आहेत.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अहमदपूर येथील डीवायएसपी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. सूर्यवंशी, तानाजी आरादवाड, राजकुमार डबेटवार, बापू धुळगुंडे, रुपेश कज्जेवाड, पाराजी पुठेवाड यांच्या पथकाने केली आहे.