लातूर : येवरीच्या सरपंचपदासाठी उमेदवारच नाही, सदस्यांचीच होणार निवड!

By हरी मोकाशे | Published: December 5, 2022 10:09 PM2022-12-05T22:09:28+5:302022-12-05T22:10:41+5:30

१२ ग्रामपंचायतींसाठी ६५ अर्ज पात्र

Latur There is no candidate for Yevari s sarpanch post only the members will be selected | लातूर : येवरीच्या सरपंचपदासाठी उमेदवारच नाही, सदस्यांचीच होणार निवड!

लातूर : येवरीच्या सरपंचपदासाठी उमेदवारच नाही, सदस्यांचीच होणार निवड!

Next

लातूर : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचाची निवड होणार असल्याने पॅनलमधील विजयी उमेदवारांची संख्या कमी-जास्त असली तरी चालेल. परंतु, सरपंचपद आपल्या गटाकडे रहावे म्हणून जोरदार व्यूहरचना आखली जात आहे. मात्र, तालुक्यातील येवरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. तिथे केवळ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

जळकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व रहावे म्हणून व्यूहरचना आखली जात आहे. जुन्या मोहऱ्यांविरुद्ध नवीन चेहऱ्यांनी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे थंडीच्या वातावरणात राजकीय वातावरण तापत आहे. निवडणूक होत असलेल्या गावांत जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

दरम्यान, येवरी वगळता उर्वरित १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ६६ तर सदस्यपदासाठी ३०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारी अर्जांची सोमवारी तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. त्यात सरपंचपदासाठीचा आणि सदस्यपदासाठीचा प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६५ तर सदस्यपदांसाठी ३०१ उमेदवारी अर्ज आहेत.

तालुक्यातील माळहिप्परगा, उमरदरा, जगळपूर, केकतशिंदगी, पाटोदा बु., गुत्ती, लाळी खु., उमरगा रेतू, होकर्णा, येवरी, हावरगा, चेरा, करंजी अशा गावांत रणधुमाळी सुरू आहे. राजकीयदृष्ट्या पाटोदा बु., करंजी, जगळपूर, माळहिप्परगा, केकतसिंदगी, लाळी खु. या गावांतील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

गावचा कारभारी होणार उपसरपंच...
येवरी ग्रामपंचायत ही ७ सदस्यांची आहे. सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र, एकही अर्ज दाखल झाला नाही. सदस्यपदांसाठी १६ अर्ज दाखल होते. छाननीत एक अर्ज अपात्र ठरला आहे. सरपंचपदासाठी अर्ज नसल्याने हे पद रिक्त राहणार आहे. निवडणुकीनंतर तात्पुरत्या स्वरूपात उपसरपंच गावचा कारभार पाहतील. तद्नंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरपंचपदासाठी पुन्हा आरक्षण सोडत होईल.
सुरेखा स्वामी, तहसीलदार.

Web Title: Latur There is no candidate for Yevari s sarpanch post only the members will be selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर