Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

By आशपाक पठाण | Published: August 1, 2023 06:00 PM2023-08-01T18:00:54+5:302023-08-01T18:01:15+5:30

Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे.

Latur: Three months benefit on the account of twelve and a half thousand farmers beneficiaries, work is not speeding up in Jalkot taluk | Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

googlenewsNext

- आशपाक पठाण 
लातूर  - राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाला शासनाने निधी दिला असून आतापर्यंत १२ हजार ४४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ५६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. निधी वाटपात चाकूर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील लाभार्थी अधिक असून इतर तालुक्यात कामाला गती येण्याची गरज आहे.

लातूर जिल्ह्यात शेतकरी लाभार्थी ५२ हजार ९४३ इतकी आहेत. यात त्यांच्या कुटुंबालील लाभार्थी संदस्यांची संख्या २ लाख ४८ हजार ६७० आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा दीडशे रूपयांप्रमाणे कुटुंब प्रमुख महिलेच्या नावाने रक्कम द्यायची आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थीच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपासून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अजूनही जवळपास ३२ टक्के लाभार्थ्यांनी अर्जही भरून दिले नाहीत. शिवाय, ज्यांनी दिले त्यांची डाटा एन्ट्री तालुकास्तरावर केली जात आहे. जिल्हास्तरावर आलेल्या यादीत सर्व पडताळणी करून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत १२ हजार ४४९ कुटुंबियांच्या खात्यावर जवळपास ५६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.यात सर्वाधिक लाभार्थी चाकूर तालुक्यातील आहेत.

रक्कम वाटपात चाकूरची आघाडी...
लातूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून असे दोन टप्प्यात सहा महिन्यांचे धान्याऐवजी रक्कम देण्यासाठी पुरवठा विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी १५० रूपयांप्रमाणे अडीच लाख लाभार्थ्यांना सहा महिन्यांची रक्कम मिळणार आहे. यासाठी २३ कोटी ६८ लाखांचा निधी पुरवठ्याकडे आला आहे. चाकूर तालक्यात सर्वाधिक ३९७७ जणांच्या खात्यावर १७ लाख ८९हजार ६५० रूपयांची रक्कम वर्ग झाली आहे.

तालुकास्तरावर कामाला गती यावी...
तालुकास्तरावर अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे डाटा एन्ट्री गतीने होत नाही. शिवाय, ३० टक्के लाभार्थ्यांनी अजून अर्जही दाखल केले नाहीत. तहसीलस्तरावर जवळपास ६८.२९ टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४८.८९ टक्के अर्जाची डाटा एन्ट्री केली आहे. १२ हजार ४४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्याचे ५६ लाख १ हजार ९०० रूपये वर्ग करण्यात आले आहेत.
- प्रियंका कांबळे 
(आयरे, जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर)

 एकुण लाभार्थी संख्या : ५३०६३
निधी वाटप लाभार्थी : १२४४९
आजवर दिलेला निधी : ५६०१९००

Web Title: Latur: Three months benefit on the account of twelve and a half thousand farmers beneficiaries, work is not speeding up in Jalkot taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.