Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ

By राजकुमार जोंधळे | Published: June 18, 2023 04:23 PM2023-06-18T16:23:37+5:302023-06-18T16:25:24+5:30

Latur: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या १ जुलैपासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे.

Latur: Three thousand employees waiting for inflation allowance! ST employees in Latur will get the benefit of increased allowance | Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ

Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ

googlenewsNext

- राजकुमार जाेंधळे

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या १ जुलैपासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. लातूर विभागातील एकूण पाच आगरांमध्ये कार्यरत असलेल्या तीन हजार कर्मचाऱ्यांना या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये हाती पडणाऱ्या वेतनामध्ये ही संपूर्ण थकबाकी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, निर्णयानंतर तातडीने अंमलबजावणी केली जात नसल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सध्या फक्त ३४ टक्के महागाई भत्ता दिला जात असून, यापूर्वी सहा टप्प्यांमध्ये वाढविण्यात आलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीचीही रक्कम पदरी पडली नाही. परिणामी, या थकबाकीची एसटी कर्मचाऱ्यांना आजही प्रतीक्षाच दिसून येत आहे. एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त तरी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता देण्याबाबत शासन स्तरावर हलचालींना गती देण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून हाेत आहे.

लातूर विभागातील आगारांत तीन हजार कर्मचारी संख्या...
महामंडळाच्या लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात जवळपास तीन हजार अधिकारी, चालक, वाहक आणि इतर, अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तर ५०० च्या घरात एसटी बसेसची संख्या असून, सध्या महामंडळाची लालपरी फायद्यात आहे. दैनंदिन प्रवासी भारमान वाढल्याने आर्थिक उत्पन्नाचा आकडा वाढला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता...
१) जुलै ते सप्टेंबर २०१८ या काळातील २ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी थकली आहे.
२) जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या काळातील ३ टक्क्यांची ९ महिन्यांची थकबाकी
३) जुलै २०१९ ते जून २०२१ या काळातील ५ टक्क्यांची २४ महिन्यांची थकबाकी
४) जुलै ते सप्टेंबर २०२१ या काळातील ११ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी
५) ऑक्टाेबर ते डिसेंबर २०२१ या काळातील ३ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी
६) जानेवारी ते ऑक्टाेबर २०२२ या काळातील ३ टक्क्यांची १० महिन्यांची थकबाकी थकली आहे.

Web Title: Latur: Three thousand employees waiting for inflation allowance! ST employees in Latur will get the benefit of increased allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.