Latur: रात्रीच्या काळाेखात दाेन दुचाकी, दाेन कारचा पुलावरच विचित्र अपघात, तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:13 AM2023-04-12T00:13:16+5:302023-04-12T00:13:35+5:30

Accident: दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन दुचाकी, दाेन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना लातूर- औसा महामार्गावरील पेठ येथील पुलावर मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली

Latur: Two-wheeler, two-car accident on bridge at night, three serious | Latur: रात्रीच्या काळाेखात दाेन दुचाकी, दाेन कारचा पुलावरच विचित्र अपघात, तीन गंभीर

Latur: रात्रीच्या काळाेखात दाेन दुचाकी, दाेन कारचा पुलावरच विचित्र अपघात, तीन गंभीर

googlenewsNext

लातूर : दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन दुचाकी, दाेन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना लातूर- औसा महामार्गावरील पेठ येथील पुलावर मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातात तीन गंभीर, तर एक किरकाेळ जखमी झाला आहे. यातील एक दुचाकी आणि एक कार पुलावरून नदीपात्रात काेसळली आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, लातूर ते औसा महामार्गाचे सध्याला काम सुरू आहे. दरम्यान, पेठ गावानजीक असलेल्या नदीवरील पूल अरुंद असून, त्याचेही काम सुरू आहे. मंगळवारी रात्री या पुलावर भरधाव असलेल्या दाेन कार आणि दाेन दुचाकींचा अपघात झाला. एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. हा अपघात एवढा विचित्र हाेता की, रात्रीच्या काळोखात काहीच समजत नव्हते. अपघातानंतर दाेन्ही बाजूंची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या गावकऱ्यांनी, तेथील वाहनधारकाने घटनेची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांना दिली. घटनास्थळी पाेलिस पथक दाखल झाले. त्यांनी तातडीने अपघातातील तिघा गंभीर जमखी आणि अन्य एका किरकाेळ व्यक्तीला उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल केले. यातील जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. चारही जखमींमध्ये पुरुष असल्याचे पाेलिसांनी सांगितले. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सहायक पाेलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, बाबूराव येणेकुरे, राहुल दराेडे, सचिन चंद्रपाटले, पाेलिस कर्मचारी खंडागळे यांनी भेट दिली.

दुचाकी, कार नदीपात्रात काेसळली...
अपघातानंतर चार वाहनांपैकी एक दुचाकी आणि एक कार नदीपात्रात काेसळली. यामध्ये दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर नदीपात्रात फारसे पाणी नसल्याने जीवित हानी झाली नसल्याचे पाेलिसांनी सांगितले, तर अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या अपघाताच्या थराराने प्रत्यक्षदर्शीच्या काळजाचा ठाेकाच चुकला.

क्षणात चारही वाहने एकमेकांवर धडकली...
पेठ येथील पुलावरील मार्ग अरुंद आहे. त्यासाठी येथे वाहने सावकाश चालवावी लागतात. मात्र, भरधाव आलेल्या वाहनधारकांचा हा अपघात एवढा विचित्र हाेता की, काही कळायच्या आतच चारही वाहने एकमेकांवर धडकली. दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन कार, दाेन दुचाकींचा अपघात झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

काही वेळासाठी वाहतूक झाली ठप्प...
लातूर- औसा महामार्गावरील पेठ पुलावर झालेल्या अपघातानंतर काही वेळासाठी दाेन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली हाेती. तातडीने अपघातातील जमखींना एका वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर पाेलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Latur: Two-wheeler, two-car accident on bridge at night, three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.