Latur: कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले, दोन युवकांचा मृत्यू, शिरुर ताजबंद-हाळी मार्गावरील घटना

By हरी मोकाशे | Published: May 7, 2023 01:32 PM2023-05-07T13:32:54+5:302023-05-07T13:33:18+5:30

Latur: कामावरून घरी परताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना उडविले. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर) नजिक घडली.

Latur: Two youths killed by unknown vehicle while returning home from work, incident on Shirur Tajband-Hali road | Latur: कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले, दोन युवकांचा मृत्यू, शिरुर ताजबंद-हाळी मार्गावरील घटना

Latur: कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले, दोन युवकांचा मृत्यू, शिरुर ताजबंद-हाळी मार्गावरील घटना

googlenewsNext

- हरी मोकाशे

लातूर -  कामावरून घरी परताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना उडविले. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर) नजिक घडली.

दत्ता बब्रुवान गुडेवार (२१, रा. हंडरगुळी) व अमित देवानंद गायकवाड (२४, रा. हाळी) असे मयत दोघा युवकांची नावे आहेत. उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी दत्ता बब्रुवान गुडेवार, अमित देवानंद गायकवाड व अन्य एकजण अहमदपूर येथे रंगकामासाठी गेले होते. हे तिघे काम आटोपून शनिवारी रात्री अहमदपूरहून हाळी हंडरगुळीकडे दुचाकीवरुन निघाले होते. शिरूर ताजबंदच्या पुढे आले असता भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दत्ता गुडेवार (२१, रा. हंडरगुळी) याचा जागीच मृत्यू झाला. तर अमित देवानंद गायकवाड (२४, रा. हाळी) याचा उपचारादरम्यान लातुरात मध्यरात्री मृत्यू झाला. या अपघातात आणखीन एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Latur: Two youths killed by unknown vehicle while returning home from work, incident on Shirur Tajband-Hali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.