लातुरात अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:21 PM2019-04-07T13:21:20+5:302019-04-07T13:24:23+5:30

यावेळी काँग्रेस, भाजप, बसपा, वंचित बहुजन आघाडीसह अन्य सहा अपक्ष रिंगणात 

in latur voter likes 'Nota' more than independent candidates | लातुरात अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक पसंती

लातुरात अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक पसंती

Next

- हणमंत गायकवाड, लातूर

लातूर : काँग्रेस, भाजप या प्रमुख उमेदवारांसह गत निवडणुकीत अपक्षांची भाऊगर्दी होती. या निवडणुकीत भाजपाचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा २ लाख ५३ हजार मताधिक्याने पराभव केला.  मात्र एका अपक्ष उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला अधिक पसंती मिळाली होती. 

२०१४ च्या निवडणुकीत आप, बसपा, सपा  उमेदवारांसह १३ अपक्षांच्या खात्यावर ६३ हजार ५३७ मते जमा झाली. तर ‘नोटा’ला १३ हजार ३९६ मतदारांनी पसंती दिली. तर भाजपच्या सुनील गायकवाड यांना ६ लाख १६ हजार ५०९ तर काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांना ३ लाख ६३ हजार ११४ मते मिळाली होती. २ लाख ५३ हजार ३९५ मताधिक्याने भाजपचा उमेदवार विजयी झाला. बसपाचे दीपक कांबळे यांना २० हजार २९, आम आदमी पार्टीचे दीपरत्न निलंगेकर यांना ९ हजार ८२९, समाज पार्टीचे बालाजी कांबळे यांना १ हजार ८४०, अपक्ष सुधीर शिंदे ८ हजार ६७८, गजानन माने ३ हजार ४०१, बहुजन मुक्ती पार्टीचे सिद्धार्थ सूर्यवंशी यांना २ हजार ८३०, भारत कदम यांना २ हजार ७२४, ज्ञानोबा जरीपटके २ हजार ५२, भारत लोंढे २ हजार ३५, पद्माकर ओव्हळ १ हजार १४१, राजकुमार चंदनशिवे १ हजार ७६५, मिनाक्षी उदारे १ हजार ५४१, शिवखंडेश्वर ढगे यांना १ हजार ३३७, फकिरा जोगदंड यांना १ हजार ३०६, गजेंद्र अवघडे १ हजार २८७, तर मिलिंद कांबळे यांना ९४२ मते मिळाली. एकंदर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांसह १३ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना एकूण ६३ हजार ५३७ मते मिळाली असून, ‘नोटा’ला १३ हजार ३९६ मतदारांनी पसंती दर्शविली. 

यंदा काँग्रेस, भाजप, बसपा, वंचित आघाडी यांच्यासह अन्य सहा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकमेव अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांनी एक लाखाहून अधिक मते मिळविली आहेत. अन्य उमेदवारांना मात्र फारसा प्रभाव टाकता आला नाही. यंदाच्या निवडणुकीतही सहा अपक्ष रिंगणात असून, मतदार त्यांना किती पसंती देतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल. 

विधानसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य घटले
२०१४ च्या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य तुलनेने घटले होते. लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस पुढे तर अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि लोहामध्ये भाजप पुढे होता. आता बदललेली समीकरणे आणि प्रचाराचा दोन्ही बाजूंचा वेग लक्षात घेता लढत तुल्यबळ होईल, असे दिसते.

Web Title: in latur voter likes 'Nota' more than independent candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.