लातूरला उजनीचे पाणी आणणार

By Admin | Published: October 1, 2016 01:03 AM2016-10-01T01:03:18+5:302016-10-01T01:17:24+5:30

लातूर : गेल्या चार वर्षांपासून लातूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

Latur will bring lukewarm water | लातूरला उजनीचे पाणी आणणार

लातूरला उजनीचे पाणी आणणार

googlenewsNext


लातूर : गेल्या चार वर्षांपासून लातूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. लातूरचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी उजनी धरणाचे पाणी आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे मत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले.
पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. सरविश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिन, विद्यार्थी संसदेचे उद्घाटन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
मंचावर महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, प्राचार्य एन.पी. सलगरे, विभाग प्रमुख बालाजी पोतदार, प्रा. खरात, विजयकुमार गायकवाड, रमाकांत बानाटे, हरिभाऊ गायकवाड, सिद्धार्थ कवठेकर, सुरेश राठोड, प्रवीण अंबुलगेकर, प्रा.डॉ. कुंभार, गिरी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Latur will bring lukewarm water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.