लातूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्का, नवीन गटांचा घ्यावा लागणार शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:58 PM2022-07-28T17:58:09+5:302022-07-28T18:00:19+5:30

जिल्हा परिषदेच्या ६६ गटांचे आरक्षण जाहीर; चर्चित बाभळगाव गट अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित

Latur Zilla Parishad Reservation Announced; A shock to the established, new groups will have to be found | लातूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्का, नवीन गटांचा घ्यावा लागणार शोध

लातूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्का, नवीन गटांचा घ्यावा लागणार शोध

googlenewsNext

- हरी मोकाशे

लातूर : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या ६६ गटांचे गुरुवारी आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे काही प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता त्यांना नवीन गटांचा शोध घ्यावा लागणार आहे. 

आरक्षणामुळे इच्छुक असलेल्या नवख्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार महेश परांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हे आरक्षण बालिकेच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. दरम्यान, आरक्षणामुळे परंपरागत गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय मंडळींना आता नव्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

अनुसूचित जाती : खंडाळी, महापूर, चिंचोली (ब.), भादा, खरोसा, रोकडा सावरगाव.
अनुसूचित जाती (महिला) : अंधोरी, हिसामाबाद, महाराणा प्रताप नगर, लामजना, उजनी, किल्लारी, पानचिंचोली.
अनु. जमाती : मदनसुरी, अनु. जमाती (महिला), बाभळगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : हडोळती, कुमठा बु., हंडरगुळी, वडवळ नागनाथ, आर्वी, काटगाव, निवळी, निटूर, कासारशिरसी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : नागलगाव, लोहारा, देवर्जन, निडेबन, चापोली, तांदुळजा, हलगरा, औराद शहाजानी.
सर्वसाधारण (महिला) : शिरूर ताजबंद, किनगाव, माळहिप्परगा, नळगीर, बोरोळ, वलांडी, येरोळ, जानवळ, नळेगाव, पानगाव, गंगापूर, एकुर्गा, शिवली, आशिव, दापका, तांबाळा.
सर्वसाधारण : वांजरवाडा, घोणसी, वाढवणा (बु.), मलकापूर, जवळगा, साकोळ, झरी (बु.), रोहिणा, खरोळा, कामखेडा, पोहरेगाव, मुरुड (बु.), आलमला, हासेगाव, मातोळा, अंबुलगा (बु.), बोरसुरी, सरवडी.

पुनर्रचनेत वाढले आठ गट
निवडणूक विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे ५८ गट होते. आता त्यात आठ गटांची भर पडली असल्याने ही संख्या ६६ वर पोहोचली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिक सदस्य पहावयास मिळणार आहेत.

जुन्या मोहऱ्यांची झाली अडचण
गेल्या एक-दोन जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेले आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या काही माजी सदस्यांचे यापूर्वीचे गट आता पुनर्रचनेत बदलले आहेत. त्यामुळे या मोहऱ्यांना पुनर्रचनेतील नवीन गटात जाऊन चांगलीच तालीम करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

मातब्बरांचे गट झाले आरक्षित
औसा तालुक्यातील लामजना, भादा, उजनी, किल्लारी, शिरूर ताजबंद, पानगाव हे गट यापूर्वीच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारणसाठी खुले होते. मात्र ते आता आरक्षित झाल्याने येथील मातब्बर मंडळींना जिल्हा परिषदेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी नवीन गटाकडे धाव घ्यावी लागणार असल्याचे आरक्षणावरून दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Web Title: Latur Zilla Parishad Reservation Announced; A shock to the established, new groups will have to be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.