लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:30 AM2022-07-27T09:30:19+5:302022-07-27T09:30:52+5:30
एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : अडीच वर्षांच्या अरिबा अयुब शेख या चिमुकलीच्या बुद्धिकौशल्याची तारीफ जगात पोहोचली असून, वेगवेगळ्या जागतिक संस्थांमध्ये तिची विशेष नोंद झाली आहे. जगातील सर्व देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, राष्ट्रध्वज, जगातल्या नकाशावर कुठे हात ठेवल्यानंतर त्याची माहिती काही सेकंदात अरिबा सांगते. वयाच्या अडीच वर्षांत विविध विक्रम अरिबाने आपल्या नावावर केले आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी अरिबा व तिच्या आई-वडिलांचा सन्मान केला.
एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे. या बुद्धिकौशल्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, इंटरनॅशनल बुक ऑफ सुपर टॅलेंटेड किड, एशियाई बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ओमजी बुक ऑफ रेकॉर्ड आदी जागतिक आणि राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. अरिबाचे वडील अयुब शेख एमटेक असून, सॉफ्टवेअर कंपनीत व्यवस्थापक आहेत. तर आई आसमा एम.एस्सी. सॉफ्टवेअर आहे.