काैटुंबीक वादातून सासरच्या मंडळींना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:35 AM2020-12-16T04:35:07+5:302020-12-16T04:35:07+5:30

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अशाबाइ राठाेड ५० रा. स्वामी समर्थ नगर, अंगाजाेगाइ राेड, लातूर यांची मुलगी प्रियंका हीचा उदगीर शहरातील ...

In-laws beaten up over family disputes | काैटुंबीक वादातून सासरच्या मंडळींना मारहाण

काैटुंबीक वादातून सासरच्या मंडळींना मारहाण

Next

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अशाबाइ राठाेड ५० रा. स्वामी समर्थ नगर, अंगाजाेगाइ राेड, लातूर यांची मुलगी प्रियंका हीचा उदगीर शहरातील सतिश चव्हाण रा. नाइक नगर याच्याशी रितीरवाजाप्रमाणे लग्न झाले. दरम्यान, पतीसह सासरच्या लाेकांनी मुलाला अंघाेळ घालण्याच्या कारणावरुन मारहाण, शिवीगाळ करत आहेत, असे फाेन करुन सांगितले. तुम्ही मला घेवून जा, असे म्हटल्याने मी आणि माझे पती, मुलगा, जावइ महादेव पवार, मुलगी पूजा, वाहनाचा चालक बाळकृष्ण लाेहारे, किरायदार मिना गिरी असे सर्वजण एका वाहनातून उदगीर येथे पाेहचला. दरम्यान, उदगीरातील देगलूर राेड येथील नाइक नगरातील घरी गेलाे. यावेळी मुलीच्या सासरच्या मंडळींनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने, राॅडने जबर मारहाण करुन जखमी केली. शिवाय, वाहनावरही हल्ला केला. यामध्ये वाहनाचे २० हजारांचे नुकसान झाले आहे.

याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सतिश गाेविंद चव्हाण, गाेविंद चव्हाण, अरुण बाबू राठाेड, रुक्मिणबाइ राठाेड, अर्चना राठाेड, दिगांबर राठाेड, चंद्रकांत गणपती राठाेड, अभिजित राठाेड यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In-laws beaten up over family disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.