वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या

By संदीप शिंदे | Published: August 18, 2023 06:07 PM2023-08-18T18:07:24+5:302023-08-18T18:07:35+5:30

निलंगा तालुक्यातील राठोडा येथील विद्यार्थी आक्रमक

leave the bus on time; Students thiyya agitation in front of Gram Panchayat | वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या

वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या

googlenewsNext

केळगाव : निलंगा तालुक्यातील राठोडा येथील मुलांना शिक्षणासाठी निलंगा येथे जावे लागते. मात्र, वेळेवर एसटी महामंडळाची बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशिर होत आहे. याबाबत ग्रामपंचायत, महामंडळ प्रशासनास सांगूनही निर्णय झालेला नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

राठोडा येथील विद्यार्थीशिक्षण घेण्यासाठी निलंगा येथे एसटी बसने ये-जा करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून बस वेळेवर येत नसल्याची विद्यार्थ्यांची ओरड आहे. जुलै महिन्यात पावसामुळे रस्ता खराब झाल्याने बस गावात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडून घरीच राहावे लागले. परिणामी, गावात बस वेळेवर यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सरपंच, उपसरपंच यांना साकडे घातले. मात्र, त्यांनी याकडे दूर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, एसटी बस वेळेवर यावी, अधिकच्या फेऱ्या कराव्यात या मागणीसाठी महामंडळाकडे पाठपुरावा करु असे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य ताजुद्दीन शेख यांनी दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

बसेस वेळेवर सोडल्या जातात...
निलंगा आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडल्या जातात. राठोडा गावात खराब रस्त्यामुळे काही दिवस बस गेलेली नाही. शुक्रवारी बसला उशिर झाला असून, याबाबत संबधितांना सुचना केल्या असल्याचे निलंगा बसस्थानक प्रमुख अशोक पवार यांनी सांगितले.

Web Title: leave the bus on time; Students thiyya agitation in front of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.