उदगीरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:27+5:302021-09-02T04:43:27+5:30
अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश वाय. पी. मनाठकर होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी उत्तम केंद्रे, सरकारी वकील ...
अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश वाय. पी. मनाठकर होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी उत्तम केंद्रे, सरकारी वकील एस. आय. बिरादार, कृषी अधिकारी वाय. एम. सातपुते, बार असोसिएशन अध्यक्ष बी. व्ही. पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी नायब तहसीलदार धाराशिवकर यांनी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, मोफत अन्न धान्य योजना याविषयी मार्गदर्शन केले. उत्तम केंद्रे यांनी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, कन्यादान योजना व वृद्ध कलावंत मानधन योजना याविषयी मार्गदर्शन केले. सरकारी वकील बिरादार यांनी मनोधैर्य योजनेची माहिती दिली. कृषी अधिकारी सातपुते यांनी कृषी योजनांची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात कायदेशीर बाबीची न्या. मनाठकर यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन ॲड. महेश मळगे यांनी केले. आभार यु. एम. केंद्रे यांनी मानले. कार्यक्रमास न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.