ऑनलाईन कार्यशाळेतून गणेशमूर्ती निर्मितीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:17+5:302021-09-05T04:24:17+5:30
लातूर : एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा कला शिक्षक पांडुरंग देशमुख यांच्या उपस्थितीत ...
लातूर : एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा कला शिक्षक पांडुरंग देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या कार्यशाळेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेसाठी समन्वयक विनोद जाधव, स्वामी विवेेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य गोविंद शिंदे, उपप्राचार्य सुनील मुचवाड, उपप्राचार्य संजय अंकुश, मुख्याध्यापक संजय बिराजदार, प्रभाकर सावंत, व्यंकट कांबळे, ए. बी. अंकुशे, पाटील, वाडीकर, वेदे, लकशेट्टी आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे या कलाकृतीचा प्रचार व प्रसार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. या उपक्रमाचे पालकांतून कौतुक होत आहे.