उदगीरच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:36 AM2021-02-21T04:36:34+5:302021-02-21T04:36:34+5:30
उदगीर : उदगीर शहर व तालुक्यात आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन ...
उदगीर : उदगीर शहर व तालुक्यात आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी केले.
दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सुरु असलेल्या शहरी बेघर निवारा बांधव व आधार बहुविकलांग बांधव यांच्या माध्यमातून सलात अल्पसंख्याक बहुद्देशीय सेवाभावी संस्था रोटी कपडा बँकेने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांचे प्रदर्शन नगर परिषेदेच्या प्रांगणामध्ये आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपमुख्याधिकारी असिफखान गोलंदाज, शहर अभियंता सल्लाओद्दीन काझी, नागनाथ निडवदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, सभापती मनोज पुदाले, सावन पस्तापुरे, नगरसेवक दत्ता पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, भाजप गटनेते बापूराव येलमटे, सभापती मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावर, मंजुरखाँ पठाण, महेबूब शेख, फय्याज शेख, शमशोद्दीन जरगर, गणेश गायकवाड, साईनाथ चिमेगावे, श्रीरंग कांबळे, अमोल अनकले, पप्पू गायकवाड, रोटी कपडा बँकेचे पदाधिकारी खुर्शीद आलम, गौस शेख, समीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे यांनी उदगीरच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगून यापूर्वी शहराच्या हद्दवाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर गौस शेख यांनी आभार मानले.
नाट्यगृह, शादिखाना, अभ्यासिकेचा प्रश्न मार्गी...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, उदगीरातील नाट्यगृह, शादीखाना, अभ्यासिका व लिंगायत भवनचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. दलित वस्तीसाठी अपेक्षित निधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसाहत, शहरातून जाणारा द्रुतगती मार्ग, बसस्थानक, हत्तीबेटच्या विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचा उपक्रम अत्यंत चांगला असून, या उपक्रमासाठी शासनाकडून जे सहकार्य आवश्यक असेल ते सर्व करण्यात येईल.
यावेळी पालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व उपाध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.