दयानंद कला महाविद्यालयात ग्रंथालय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:10+5:302021-08-13T04:24:10+5:30
लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये कार्यशाळा लातूर : येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयातील ...
लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये कार्यशाळा
लातूर : येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयातील शिक्षिकांसाठी टीचर्स एम्पाॅवरमेंट या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य कर्नल एस.ए. वरदन, मुख्याध्यापिका सुनीता बोरगावकर, स्वरांजली भालेकर, देवयानी देशपांडे, उपप्राचार्य विक्रम माने, मुख्याध्यापिका विद्या साळवे आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मोहन कोळी यांचा लातुरात सत्कार
लातूर : येथील जिल्हा माहिती कार्यालयातील वाहन चालक मोहन कोळी यांची उस्मानाबाद येथे बदली झाल्याने त्यांचा जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपसंचालक सुनील सोनटक्के, माहिती सहायक फहद मखदूम काझी, लेखापाल अशोक माळगे, प्रवीण बिदरकर, वरिष्ठ लिपिक मनीषा कुरूलकर, विशाखा शेंडगे, अहेमद बेग, अश्रुबा सोनवणे, बालाजी केंद्रे, अशोक बोर्डे, बनसोडे, कलीम शेख आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
दासराव अणदूरकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
लातूर : येथील दासराव केशवराव अणदूरकर यांनी लिहिलेल्या ‘भारत : पासष्ट पोलादी पाने अर्थात आक्रमणे आणि
स्वातंत्र्यसंघर्ष’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या अध्यक्षतेखाली, घनश्याम पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील स्वानंद मंगल कार्यालय येथील कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन यशवंत दासराव अणदूरकर यांनी केले आहे.