तीन ऑटाेसह सव्वासहा लाखांचा दारूसाठा जप्त !
By राजकुमार जोंधळे | Published: December 9, 2022 07:28 PM2022-12-09T19:28:04+5:302022-12-09T19:45:55+5:30
उत्पादन शुल्कच्या कारवाईत सहाजण ताब्यात
लातूर : वेगवेगळ्या भागात अवैध दारूची ऑटाेमधून वाहतूक करताना सहा जणांना ऑटाेसह अटक करण्यात आली. त्यावेळी जवळपास सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी केली. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांनी आणि लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारूविक्रीप्रकरणी धडक कारवाई माेहीम सुरु केली आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लातुरातील गूळ मार्केट चाैक, नांदेड राेड परिसरातील दाेन चाैकांत सापळा लावला. यावेळी ऑटाे रिक्षातून अवैध दारुची वाहतूक करताना १६९ लिटर विदेशी दारू, १६ लिटर देशी दारू, ४० लिटर बीअर, २५ लिटर ताडी आणि तीन रिक्षा असा एकूण ६ लाख १८ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबराेबर चाकूर तालुक्यातील नागेशवाडी परिसरातील दाेन धाब्यांवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापा मारला असून, दाेन गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमाेल शिंदे, स्वप्निल काळे, सहायक दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी, गणेश गाेले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, हनमंत मुंडे, संताेष केंद्र यांच्या पथकाने केली.