लातूरमध्ये १५ लाखांची दारु जप्त, ३९ जणांना अटक; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: August 29, 2023 09:12 PM2023-08-29T21:12:31+5:302023-08-29T21:12:45+5:30
लातूर जिल्ह्यात ८ ते २८ ऑगस्ट कालावधीत विविध ठिकाणी चाेरट्या मार्गाने, अवैधपणे सुरु असलेल्या दारुविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्या
लातूर : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीवर लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे धाडी टाकल्या. यावेळी एकूण ३९ जणांना अटक करण्यात आली. जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल, दारुसाठा जप्त केला असून, याबाबत २९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यात ८ ते २८ ऑगस्ट कालावधीत विविध ठिकाणी चाेरट्या मार्गाने, अवैधपणे सुरु असलेल्या दारुविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्या असून, याप्रकरणी २९ गुन्हे दाखल करण्यात आली आहे. यात ३९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८५५ लिटर देशी दारु, ५२ लिटर बिअर दारु, १०५ लिटर विदेश दारु, ७८४ लिटर हातभट्टी जप्त केली आहे. यावेळी बारा चारचाकी, दुचाकी वाहनासह तब्बल १५ लाख ८४ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत, निरीक्षक आर.एस. काेतवाल, आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्नील काळे, ए.बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, अनंत कारभारी, नीलेश गुणाले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.