Lok Sabha Election 2019 : लातुरात खासदारांचा पालकमंत्र्यांवर ठपका!; संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, मतभेद नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 02:37 PM2019-03-23T14:37:25+5:302019-03-23T14:40:22+5:30

संसदीय कामकाज समाधानकारक असूनही माझ्यावर अन्याय केला

Lok Sabha Election 2019: MP Gaikwad rises question on Guardian Minister in Latur! Sambhaji Patil Nilangekar says there are no differences | Lok Sabha Election 2019 : लातुरात खासदारांचा पालकमंत्र्यांवर ठपका!; संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, मतभेद नाहीत 

Lok Sabha Election 2019 : लातुरात खासदारांचा पालकमंत्र्यांवर ठपका!; संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, मतभेद नाहीत 

googlenewsNext

लातूर : भाजपने लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात तिकीट नाकारल्याने खा.डॉ. सुनील ब. गायकवाड नाराज झाले. माझा पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे; परंतु स्थानिक नेतृत्वाने विरोध केल्याने तिकीट कापले गेले. संसदीय कामकाज समाधानकारक असूनही माझ्यावर अन्याय केला, अशी भावना खा. गायकवाड यांनी व्यक्त केली, तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी देणे हा पक्षाचा निर्णय असून, आमच्यात मतभेद नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

भाजपा लातूर लोकसभेचा उमेदवार बदलणार ही चर्चा अखेर खरी ठरली. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारत अपेक्षेप्रमाणे सुधाकर शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शेवटपर्यंत आपणाला तिकीट मिळणार, असा विश्वास असणारे खा. गायकवाड यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. ते म्हणाले, माझ्या कामावर मी समाधानी आहे. सरळ राजकारण केले. पक्षात गटबाजी केली नाही. संसदीय कामकाजात सहभाग नोंदविला. अडीच लाखांच्या फरकाने निवडून आलो होतो. शिवाय, माझ्यासारखे काम खुल्या जागेवर करणारा खासदार असता तर त्याचे तिकीट कापले गेले नसते, असे शल्य व्यक्त केले. 

यासोबतच खा. गायकवाड म्हणाले, स्थानिक नेतृत्वाने विरोध केला. माध्यमे उघडपणे पालकमंत्र्यांचे नाव घेत आहेत. त्यामुळे मला तिकीट मिळाले नाही, यामागे पक्षश्रेष्ठी नसून स्थानिकांचा हातभार आहे. कोणाला कशी उमेदवारी मिळाली, हे सर्वज्ञात आहे.

दरम्यान, उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, उमेदवारीचा निर्णय पक्षाने घेतला. तो सर्वांना मान्य आहे. खा.डॉ. हे माझे मित्र आहेत. त्यांच्याशी कसलेही मतभेद नाहीत. यापुढेही ते पक्षाचे काम आणि प्रचार करतील, असेही ते म्हणाले. 

पालकमंत्र्यांच्या निवेदनानंतर खा. डॉ. सुनील गायकवाड आपली तलवार म्यान करतील की, वेगळी वाट शोधतील हे लवकरच कळणार आहे. तूर्त तरी खा. गायकवाड यांनी पक्षात राहणार असल्याचे सांगत मी निष्ठावान आहे, हा संदेश दिला आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2019: MP Gaikwad rises question on Guardian Minister in Latur! Sambhaji Patil Nilangekar says there are no differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.