लोकमतने कर्तृत्ववान महिलांचा गौरव प्रेरक : जिल्हाधिकारी

By admin | Published: October 17, 2016 09:14 PM2016-10-17T21:14:26+5:302016-10-17T22:03:46+5:30

लोकमत सखी मंचच्या वतीने विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या आठ कर्तृत्ववान महिलांना लोकमत सखी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Lokmat is proud of the women of a good work: collector | लोकमतने कर्तृत्ववान महिलांचा गौरव प्रेरक : जिल्हाधिकारी

लोकमतने कर्तृत्ववान महिलांचा गौरव प्रेरक : जिल्हाधिकारी

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १७ : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाºया आठ कर्तृत्ववान महिलांना ‘लोकमत सखी सन्मान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. जोत्स्ना कुकडे यांना सेवा क्षेत्रासाठी जिवनगौरव पुरस्काराने, डॉ. अर्चनाताई चाकूरकरांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल, प्राचार्य कुसुमताई मोरे यांना शैक्षणिक योगदानाबद्दल,शास्रीय नृत्यशिक्षिका प्रा. नभा बडे यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, माया सोरटे यांना सामाजिक क्षेत्राबद्दल, उमादेवी जाधव यांना शौर्य गटासाठी तर आंतरराष्टÑीय खेळाडू जागृती चंदनकेरे यांना क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सोमवारी दयानंद सभागृहात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. 

‘लोकमत’ने कृर्तत्ववान महिलांना पुरस्कार देऊन केलेला हा गौरव प्रेरक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केले. यावेळी मनपा आयुक्त रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रारंभी जिल्हाधिकारी पोले आणि आयुक्त पवार यांच्यासह कार्यक्रमाचे प्रायोजक राजयोग इंड्रस्ट्रीचे प्रविण ब्रिजवासी आणि दत्तात्रय पाटील, संगम हायटेक नर्सरीचे संगमेश्वर बोमणे, विष्णूभैय्या खोडवेकर प्रतिष्ठानचे मनोज डोंगरे यांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. 
यानंतर बोलताना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले की, ‘लोकमत’ने मारलेली ही कौतुकाची थाप कौतुकास्दप आहे. केलेल्या कामाची अशी पावती मिळाली की कामाला नवा हुरुप येतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील या महिलांनी केलेले काम पाहून जिल्ह्याला अभिमान वाटेल, अशा शब्दात गौरव केला. तर मनपा आयुक्त रमेश पवार यांनी, ‘लोकमत’ने दिलेली शाबासकी नवीन ऊर्जा देणारी असल्याचे सांगून महिलांनी करिअरसाठी वेगवेगळ्या वाटा धुंडाळाव्यात असे आवाहन केले. 
प्रारंभी जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले तर शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले.
 
लातूरकरांनी मला ‘काकू’ म्हणून स्विकारले हा सर्वात मोठा सन्मान ! :   कुकडे
 
मुळच्या पुण्याच्या पण सेवेच्या निमित्ताने लातुरात स्थिरावलेल्या डॉ. जोत्स्ना कुकडे यांनी ‘लोकमत’ने दिलेला हा जीवगौरव पुरस्कारही माझ्यासाठी विशेष असल्याचे सांगत मला लातूरकरांनी ‘काकू’ म्हणून स्विकारले. परिवारात घेतले, हा माझा सवोत्कृष्ठ सन्मान असल्याचे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 
 
उमादेवींचा शौर्य पुरस्कार घेणाºया पिताश्री शिवदास कदम यांना उभे राहून टाळ्यांची सलामी ! 
 
चाकूरच्या उमादेवी जाधव यांचे पती लष्करात होते. ते शहिद झाले. यानंतर आपल्या पतीची सेवा आपण स्विकारुन उमादेवीही लष्करात भरती झाल्या. त्यांना ‘लोकमत’ने शौर्य गटासाठी सखी सन्मान पुरस्कार दिला. परंतु भारत-पाक तणावामुळे त्यांच्या सुट्या रद्द झाल्याने त्यांना कार्यक्रमाला येता आले नाही. त्यांचे वडील शिवदास कदम हे पुरस्कार स्विकारण्यासाठी आले होते. त्यांना पुरस्कार देताना सभागृहातील सखी मंच सदस्यांनी उभे राहून टाळ्यांची सलामी देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Lokmat is proud of the women of a good work: collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.