loksabha2024: लातूर लोकसभेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान
By संदीप शिंदे | Published: May 7, 2024 12:18 PM2024-05-07T12:18:50+5:302024-05-07T12:23:55+5:30
निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रात विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून मतदान सुरू झाले असून, सकाळी ११ वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान झाले आहे.सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९३ टक्के मतदान झाले होते. मतदान करण्यासाठी मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागल्या असून, निवडणूक विभागाकडून केंद्रात विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात मतदान करण्यासाठी मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा, निवडणूक विभागाकडून केंद्रात विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. #LokSabhaElection2024#laturloksabhapic.twitter.com/9xw8MOyXg2
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 7, 2024
सकाळी ९ ते ११ या दोन तासांत १३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असून, लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, लोहा-कंधार, रेनापूर, चाकूर, अहमदपूर आदी मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मतदान सुरू झाल्यावर उदगीर तालुक्यातील डोंगरशेलकी, देवणी तालुक्यातील वलांडी, लातूर शहरातील इंडिया नगर येथील एका मतदान केंद्रावर यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान काही वेळ थांबले होते. आता सर्वच केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
सुनेगाव सांगवी गावात सकाळी ११ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. #LokSabhaElection2024#laturloksabhahttps://t.co/17hq8b8fys
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 7, 2024