कमी दबाने वीजपुरवठा, शेतकरी, ग्राकांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:40+5:302020-12-23T04:16:40+5:30
शिरुर ताजंबदला उपविभागीय कार्यालय... जळकोट तालुक्यात २२० केव्ही उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्याचे उद्घाटन झाले नाही. वीजबिलाच्या ...
शिरुर ताजंबदला उपविभागीय कार्यालय...
जळकोट तालुक्यात २२० केव्ही उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्याचे उद्घाटन झाले नाही. वीजबिलाच्या वसुलीचे प्रमाण चांगले आह. असे असतानाही महावितरणकडून सेवा मात्र समाधानकारक दिली जात नाही, असा आराेप शेतकऱ्यांसह ग्राहकातून केला जात आहे. वाडी-तांड्याची संख्याही अधिक आहे. येथील राहित्र जळण्याचे प्रमाण अधिक आहे. ते बदलून अथवा दुरुस्त करुन लवकर मिळत नाही. रोहित्र जळण्याची संख्या कमी असली तरी, जळालेले राेहित्र वेळवर मिळत नाही. जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असूनही महावितरणचे उपविभागीय कार्यालय शिरुर ताजबंद येथे आहे. ग्राहकांना ५० किमी अंतरावरील कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. परिणामी, शेतकरी, ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.