महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘उदयगिरी’ला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:11+5:302021-01-09T04:16:11+5:30

उदगीर : उदगीर सभोवतालच्या हवेतील प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाला ...

Maharashtra Pollution Control Board approves 'Udayagiri' | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘उदयगिरी’ला मान्यता

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘उदयगिरी’ला मान्यता

Next

उदगीर : उदगीर सभोवतालच्या हवेतील प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाला हवा देखरेख व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्तीपत्र दिले आहे.

संस्था व महाविद्यालयाने या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी समन्वयक म्हणून पर्यावरण विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांची निवड केली आहे. त्यांना सहयोगी प्रा. डॉ. राजू नारखेडे हे सहकार्य करणार आहेत. उदयगिरी महाविद्यालयाला हा प्रकल्प मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे, संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी सहकार्य केले. पर्यावरण शास्त्र विभागाच्या या कामगिरीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के आदींनी कौतुक केले.

Web Title: Maharashtra Pollution Control Board approves 'Udayagiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.