गावामध्ये कुपाेषण, शहरात अतिपाेषण; काेराेनाकाळात मुलांचे ‘वजन’ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:24 AM2021-09-06T04:24:13+5:302021-09-06T04:24:13+5:30

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून ...

Malnutrition in the village, malnutrition in the city; Children's 'weight' increased during Kareena period! | गावामध्ये कुपाेषण, शहरात अतिपाेषण; काेराेनाकाळात मुलांचे ‘वजन’ वाढले !

गावामध्ये कुपाेषण, शहरात अतिपाेषण; काेराेनाकाळात मुलांचे ‘वजन’ वाढले !

Next

काेराेनाचा सर्वच समाज जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. शाळांसह इतर शैक्षणिक संस्थांना अद्यापही टाळे आहेत.परिणामी, गत मार्च २०२० पासून मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. परिस्थिती बदलल्याने सर्वच मुले तंत्रज्ञानामध्ये अडकून पडले आहेत. परिणामी, मैदानी खेळ बंद झाले असून, मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. तासन्तास एकाच ठिकाणी, घरातच बसून राहिल्याने वजनवाढीची समस्या निर्माण झाली आहे.

पालकांच्या चेहऱ्यावर चिंता...

काेराेनाच्या काळात शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षणप्रणाली सुरू झाली. यातून मुलांना एकाच ठिकाणी तासन्तास बसून रहावे लागत आहे. अद्यापही काेराेनाची भीती गेली नाही. आता तर संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत मुलांना घराबाहेर पाठवायचे कसे ही चिंता माझ्यासारख्या पालकांच्या चेहऱ्यावर आहेत. - गाेविंद भंगे, लातूर

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत शाळा कशा उघडणार, हाही प्रश्न गंभीर आहे. गत दीड वर्षापासून शाळांना टाळे आहेत. अशा स्थितीत मुले घरातच काेंडून आहेत. यातून त्यांची मानसिकता बदलली आहे. यातून आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. - प्रकाश जाधव, उदगीर

शहरात स्थूलता ही नवी

समस्या...

लातूर शहरातील मुलांमध्ये स्थूलता, लठ्ठपणा वाढवणे ही समस्या आता नव्याने समाेर आली आहे. काेराेनाच्या काळात शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणामुळे तासन्तास एकाच ठिकाणी बसून राहत आहेत. शिवाय, मैदानी खेळ बंद झाले आहेत. मुलांचे घराबाहेर फिरणे, वावरणेही बंद झाले आहे. परिणामी, मुलांच्या आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले असून, वजन वाढत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना घरातच काेंडून ठेवण्याची वेळ बहुतांश पालकांवर आली आहे. त्यातच ऑनलॉइन शिक्षणाच्या नावाखाली तासन्तास त्यांना एकाच ठिकाणी बसण्याचीही शिक्षा दिली जात आहे. याचा परिणामी त्यांच्या मानसिकतेवर हाेत आहे. मग मुलामध्ये चिडचिडपणा, ओरडणे, स्थूलपणा, वजन वाढण्याची समस्या निर्माण हाेत आहे. - डाॅ. विश्रांत भारती, लातूर

सतत १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ मुलांना घरातच काेंडून रहावे लागले आहे. ऑनलाइन शिक्षणाने तर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल झाला आहे. भाेजन, झाेप आणि दैनंदिन वेळापत्रकात बदल झाला आहे. यातूनच मुलांच्या वजन वाढण्याच्या समस्या समाेर आल्या आहेत. पाेटाचा घेर वाढत असून, आळस वाढला आहे. - डाॅ. ओमप्रकाश कदम, उदगीर

कारणे काय...

१ काेराेना काळात शाळांना टाळे आहे. परिणामी, शाळेत हाेणाऱ्या शारीरिक हालचाली, मैदानी खेळ बंद झाले. यातून मुलांच्या आराेग्यावर परिणाम झाला आहे.

२ शहरातील मुले दिवस-दिवस घरातच बसून राहत असल्याने आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वेळेवर जेवण आणि झाेपही मिळत नाही. तासनतास माेबाइल, टीव्हीसमाेर मुले बसून आहेत.

३ शाळा सुरू असताना हाेणारी शारीरिक हालचाल सध्याला बंद झाली आहे. दिवसदिवस बसून राहिल्याने अपचनाची समस्याही निर्माण झाली आहे.

Web Title: Malnutrition in the village, malnutrition in the city; Children's 'weight' increased during Kareena period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.