मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 08:22 PM2023-04-30T20:22:23+5:302023-04-30T20:22:30+5:30

तीन दिवस अगोदर रोटेशन थांबविले.

Manjra Project: Five dalghmi water saving due to monsoon | मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत

मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत

googlenewsNext

लातूर :लातूर शहरासह जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असले तरी मांजरा प्रकल्पातील पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे. प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी थांबविले आहे. यामुळे उजव्या कालव्यातील अडीच दलघमी आणि डाव्या कालव्यातील अडीच दलघमी असे मिळून पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे.

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून ११ एप्रिल पासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच २० एप्रिल नंतर प्रकल्प आणि पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी बंद झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे प्रशासनाने कालव्यातून सोडलेली पाणी बंद केले आहे. रोटेशन संपण्यापूर्वी तीन दिवस अगोदर कॅनॉल मधून सोडण्यात येणारे पाणी बंद झाल्यामुळे पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे. आता शेवटची पाळी ११ ते ३० मे दरम्यान नियोजित आहे. तोपर्यंत उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही. उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी सोडण्यात येणारे रोटेशन हे शेवटचे असणार आहे.

उन्हाळी हंगामात साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली.....

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून एकूण साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र उन्हाळी हंगामात भिजवले जाते. त्यात उजव्या कालव्याअंतर्गत ३ हजार हेक्टर तर डाव्या कालव्या अंतर्गत साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कालव्यात पाणी सोडल्यामुळे विहिरी व नदीलाही पाणी वाढते. यामुळेही सिंचन क्षेत्रात वाढ होते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात पाणी सोडल्यामुळे दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते, अशी माहिती प्रकल्पावरील अधिकारी सुरज निकम यांनी दिली.

मांजरा प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ नाही....
मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मांजरा प्रकल्प क्षेत्रात झाला असला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. उन्हाळ्यात कितीही अवकाळी पाऊस मोठा झाला तरी मोठ्या प्रकल्पात पाण्याची वाढ होऊ शकत नाही, असा आज वरचा अनुभव आहे. फायदा एवढाच उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी बंद करावे लागले. त्यामुळे पाच दलघमी पाण्याची बचत झाली.

प्रकल्पात ४४.४५ टक्के पाणीसाठा...

मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत ४४.४५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. सध्या धरणात १२५.७८७ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. त्यापैकी ७८.६५७ जिवंत पाणीसाठा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी नियोजन आहे. त्यानुसार शेवटचे रोटेशन ११ ते ३० मे दरम्यान असेल.

Web Title: Manjra Project: Five dalghmi water saving due to monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर