महात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात केल्यास मानवाचा उध्दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:48+5:302021-05-16T04:18:48+5:30
चापोली येथील संजीवनी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित महात्मा बसवेश्वर महाराजांची आजच्या पिढीसाठी उपयुक्त शिकवण या विषयावर ऑनलाईन ...
चापोली येथील संजीवनी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित महात्मा बसवेश्वर महाराजांची आजच्या पिढीसाठी उपयुक्त शिकवण या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्था सचिव डॉ. नारायणराव चाटे होते. उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते. यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक डॉ. वसंत भोसले, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दीपक बच्चेवार, डॉ. रमाकांत घाडगे पाटील, परमेश्वर हासबे, अलगरवाडीचे सरपंच गोविंद माकणे उपस्थित होते.
जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामीजी म्हणाले, समाजामध्ये आर्थिक समानता असली पाहिजे. मानवाने आयुष्यात कधीच खोटे बोलू नये. कष्ट हेच जीवन आहे. कष्टाने मानवाने आपले कुटुंब जगविले पाहिजे. कष्टातच खरे सुख आहे. १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला. खऱ्या अर्थाने आज हा लढा तीव्र करून वर्णभेद विरहित समाज बनविणे काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पृथ्वीतलावावर मानव जात टिकेल. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे सामाजिक जीवनकार्यावर सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. धनंजय चाटे यांनी, सूत्रसंचालन प्रा. श्रीहरी वेदपाठक, प्रा. संदीप मुंढे यांनी केले. आभार प्रा. डॉ. सिद्धेश्वर शेटकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत चोले, प्रा. अशोक गुरमे, संतोष नागरगोजे, शेषेराव सोगेवाड आदींनी परिश्रम घेतले.