मराठा क्रांती मोर्चाचे लातूर येथे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 06:34 PM2020-09-27T18:34:01+5:302020-09-27T18:34:26+5:30
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याविषयीची फेरयाचिका तात्काळ दाखल करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. विक्रम काळे यांच्या घरासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले.
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याविषयीची फेरयाचिका तात्काळ दाखल करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. विक्रम काळे यांच्या घरासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षण टिकविण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. स्थगिती आदेशाच्या अनुषंगाने आदेशाच्या दिवसापर्यंत ज्या- ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश झाले आहेत, नियुक्त्या मिळाल्या आहेत त्या सर्वांना संरक्षण देण्यात यावे, स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरतीसह कुठलीही मेगाभरती करू नये, असेही आंदोलनकर्त्यांनी आ. विक्रम काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भगवान माकणे, आदित्यराणा चव्हाण, प्रवीण खाडप, बालाजी जाधव, अनिल जाधव, विशाल हल्लाळे, किशन कदम, सचिन साळुंके, दयानंद जाधव, निखिल मोरे, संजय क्षीरसागर, विजयकुमार महाजन, चंद्रकांत शिंदे, गोविंद सूर्यवंशी, सतीश करडे, जीवन तुपे, आकाश येरटे, विलास भोसले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.