छत्रपती शिवरायांच्या विचारांवरच मराठा सेवा संघाची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:18+5:302021-09-02T04:44:18+5:30
निलंगा : महाराष्ट्रातील बहुजनांना सोबत घेऊन समाजप्रबोधनाचे कार्य मराठा सेवा संघ करत आहे. सेवा संघात जाती-पातीला थारा नाही. ...
निलंगा : महाराष्ट्रातील बहुजनांना सोबत घेऊन समाजप्रबोधनाचे कार्य मराठा सेवा संघ करत आहे. सेवा संघात जाती-पातीला थारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवरच मराठा सेवा संघाची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश जाधव यांनी बुधवारी केले.
मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, प्रा. डॉ. हंसराज भोसले, एम. एम. जाधव, समाधानताई माने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार जाधव म्हणाले, युवकांनी व्यवसाय करावा. त्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक महामंडळाचा लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षेत भरारी घ्यावी. शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएसची सवलत घेता येते.
यावेळी प्रा. डॉ. हंसराज भोसले म्हणाले, १९९०ला मराठा सेवा संघाची स्थापना होऊन लोकचळवळीला सुरुवात झाली. प्रबोधनात्मक परिवर्तन करण्यात येत आहे. मराठा सेवा संघांतर्गत ३२ विविध कक्ष आहेत. केवळ समाजप्रबोधन न करता प्रत्येक गोष्टीवर विकल्प दिला. म्हणूनच सेवा संघाची विचारांची क्रांती झपाट्याने होत आहे.
प्रास्ताविक उत्तम शेळके यांनी तर सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले. आर. के. नेलवाडे यांनी आभार मानले. यावेळी माजी प्राचार्य दिलीप धुमाळ, आर. के. नेलवाडे, डॉ. उद्धव जाधव, माजी मुख्याध्यापक टी. व्ही. भालके, एस. एन. शिरमाळे, एन. व्ही. इंगळे, सुनील शेळगावकर, विनोद सोनवणे, अतुल देशमुख, आनंद जाधव, किरण धुमाळ, प्रमोद कदम, अजित लोभे, विष्णू मोहिते, डी. एस. धुमाळ, ॲड. तिरुपती धुमाळ, राजेंद्र बरमदे, कुमोद लोभे, डी. एन. बरमदे, सुनील टोंपे, शिवाजी भदरगे, तानाजी माकणीकर, मोहन घोरपडे, शरद सोळुंके, प्रताप हंगरगे, सुधाकर धुमाळ, नाना धुमाळ, अंजली भोसले, अर्चना जाधव, वैशाली इंगळे, रंजना जाधव, लता जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.