मराठवाड्यात होतेय अजून पडताळणीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:30 AM2017-11-20T05:30:49+5:302017-11-20T05:31:04+5:30

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़

In Marathwada, there is still more scrutiny | मराठवाड्यात होतेय अजून पडताळणीच

मराठवाड्यात होतेय अजून पडताळणीच

Next

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़, परंतु पडताळणी करूनच रक्कम अदा करावी, अशा सूचना दिल्या आहेत़ परिणामी, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़
औरंगाबाद जिल्ह्यात २२९ शेतकºयांच्या खात्यात ५२,५३,९७४ कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. बीड जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले असले, तरी आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख कर्जमाफ झाले.
आठवडाभरापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया गोठलेलीच आहे़ मागील आठवड्यात शासनाकडून ५८ शेतकºयांची यादी बँकेला देण्यात आली होती़ आतापर्यंत ५८ पैकी ५१ शेतकºयांनाच १८ लाख १ हजार ९८१ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे़
मागच्या यादीत थोडासा घोळ झाला होता़ ही बाब शासनास कळविण्यात आली आहे़ त्यानंतर, नव्या फॉरमॅटमध्ये काम करण्याच्या सूचना मिळाल्या़ सतत बदलणाºया नियमांमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली़
नांदेड जिल्ह्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची निश्चित संख्या उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार १३३ शेतकºयांचे ३ लाख १२ हजार ७१२ अर्ज अपलोड करण्यात आले आहे. जिल्हा बँकेमार्फत ७१ हजार १८८ शेतकºयांची माहिती पाठविली आहे.
जालना जिल्ह्यातील ६ हजार १५५ पात्र शेतकºयांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी बँकांना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांना पैसे वर्ग करण्यात आले, याची आकडेवारी मिळाली नाही. परभणी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची ४४ कोटी २५ लाख ४९ हजार २८३ रुपयांची रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मिळाली असून, ही रक्कम पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे़
>जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा बँकेमार्फत शेतकºयांची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आॅनलाइन अर्जाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. शासनाकडून सर्व शेतकºयांना लवकरच कर्जमाफीची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
>शासनाच्या आयटी विभागाच्या निर्देशानुसार, जिल्हा बॅँकेच्या कर्जदार शेतकºयांच्या डाटा अपलोडिंगचे काम पूर्णत्वाकडे आहे. बॅँकेचे १ लाख १६ हजार शेतकरी कर्जदार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख रुपये कर्जमाफ झाले आहे. लवकरात लवकर उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- आदित्य सारडा, अध्यक्ष जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बॅँक, बीड

Web Title: In Marathwada, there is still more scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.