शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

By हरी मोकाशे | Published: September 14, 2022 05:55 PM2022-09-14T17:55:12+5:302022-09-14T17:55:35+5:30

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

March of Anganwadi workers, helpers to demand the status of government employees | शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

googlenewsNext

लातूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभ लागू करावेत. दरम्यान, त्यांना पूर्णवेळ कर्मचारी घोषित करुन मासिक २१ हजार रुपये किमान वेतन लागू करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात राज्य शासनाने ऑक्टोबर २०१७ मध्ये वाढ केली होती. दरम्यान, महागाई वाढल्याने मानधनात भरीव वाढ करावी. सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनातील तफावत कमी करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी सेवा समाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेन्शन लागू करावी. मानधन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत देण्यात यावे. अंगणवाडीच्या कामकाजासाठी नवीन मोबाईल घेण्यासाठी आयुक्तांनी शासनाकडे प्रत्येक अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तो त्वरित मंजूर करण्यात यावा. मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनीसांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात अनियमितता आहे. ती दूर करुन भत्त्यात वाढ करण्यात यावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: March of Anganwadi workers, helpers to demand the status of government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.