अल्पवयीन मुलीचा विवाह; पतीसह सात जणांवर गुन्हा
By हरी मोकाशे | Published: March 17, 2024 04:48 PM2024-03-17T16:48:31+5:302024-03-17T16:48:36+5:30
याबाबत गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी उत्तम कचरू राठोड यांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.
उदगीर : तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २७ मे २०२३ रोजी विवाह लावण्यात आला होता. याप्रकरणी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाढवणा पोलिस ठाण्यात त्या अल्पवयीन मुलीच्या पतीसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, २७ मे २०२३ रोजी दुपारी डोंगरशेळकी तांडा येथे वसंत पवार यांच्या घरासमोर एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. याबाबत गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी उत्तम कचरू राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी उषा गोपाळ सुरवसे, गोपाळ केशव सुरवसे (रा. मतकर कॉलनी, झोपडपट्टी, सातारा), पती आकाश भास्कर सूर्यवंशी, सुनिता भास्कर सूर्यवंशी, भास्कर माधवराव सूर्यवंशी (रा. तळेगाव, ता. शिरुर अनंतपाळ), अभिजित वसंत पवार, वसंत श्रीपती पवार या सात जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार वाढवणा पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.