लातूर जिल्हा क्रीडा संकुलात १९०० विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत
By संदीप शिंदे | Published: August 17, 2022 01:49 PM2022-08-17T13:49:34+5:302022-08-17T13:50:05+5:30
जिल्हाभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
लातूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडा संकुलात विविध शाळेतील १९०० विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा साकारत सामूहिक राष्ट्रगीत सादर केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे देशाच्या नकाशाची, तिरंगा आणि अमृत महोत्सव दर्शविणारी प्रतिकृती देशीकेंद्र विद्यालय आणि गोदावरी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारली. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती.