अहिल्यादेवी विद्यालयात गणित दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:56+5:302020-12-23T04:16:56+5:30

मंचावर संस्थेच्या सचिव तथा माजी जि. प. सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे, राजाराम बुर्ले, शेख जिलानी, संतोष मुळे, अमोल ...

Math Day celebrated at Ahilya Devi Vidyalaya | अहिल्यादेवी विद्यालयात गणित दिवस साजरा

अहिल्यादेवी विद्यालयात गणित दिवस साजरा

Next

मंचावर संस्थेच्या सचिव तथा माजी जि. प. सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे, राजाराम बुर्ले, शेख जिलानी, संतोष मुळे, अमोल सारोळे, विठ्ठल तेलंग, कौशल्या देवकते, प्रदीप रेड्डी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गणिताच्या विविध प्रतिकृती, आकृत्या आदी शैक्षणिक साहित्य तयार करून आणले होते. तर साईप्रसाद येलडे आणि ज्ञानेश्वरी देवकते या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या तरडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी लहान वयापासून चिकाटी परिश्रम आणि जिद्द या त्रिसूत्रांचा वापर केला तर नक्कीच भविष्य उज्वल ठरते. त्याचबराेबर गणितात आवड असणारे विद्यार्थी नक्कीच कोणत्याही विषयात सरसच ठरतात. यावेळी संतोष मुळे यांनीही आपले मत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप रेड्डी यांनी तर आभार जिलानी शेख यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Math Day celebrated at Ahilya Devi Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.