MBBS च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या, लातुरातील घटना

By राजकुमार जोंधळे | Published: August 31, 2022 12:21 PM2022-08-31T12:21:43+5:302022-08-31T12:22:16+5:30

शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या

MBBS student commits suicide incident in Latur | MBBS च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या, लातुरातील घटना

MBBS च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या, लातुरातील घटना

Next

लातूर

शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. भागवत सुनील बडे (वय २१, देवदहिफळ ता. धारूर जि. बीड) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितले, बीड जिल्ह्यातील भागवत सुनिल बडे हा शालेय जीवनात खूपच हुशार होता. त्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस शाखेला प्रवेश मिळविला होता. मयत भागवत याच्या घरची परिस्थिती तशी जेमतेमच होती. मात्र, अभ्यासात कायम आघाडीवर असलेल्या भगवतने सलग दोन वर्ष उत्तम गुण मिळवून यश मिळवले होते. दरम्यान, त्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते. तो सध्याला अंबाजोगाई रोडवर एमआयटी मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या एका मुलाच्या वसतिगृहात राहत होता. त्याने मंगळवारी दुपारनंतर आपल्या खोलीतच गळफास घेत मरणाला कवटाळले. ही घटना सोबत राहणाऱ्या मुलांना सायंकाळच्या सुमारास समजली. घटनास्थळी विवेकानंद चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक उदय सावंत यांच्यासह पोलीस पथकाने भेट देवून पंचनामा केला. भागवत बडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून, मृतदेह बुधवारी सकाळी त्याच्या कुटूंबियाच्या ताब्यात देण्यात आले. 

याबाबत एमआयटच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आर.एन. कुडमुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात बुधवारी नोंद करण्यात आली आहे. 

कारण मात्र अस्पष्ट...
मयत भागवत बडे या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्याचा एवढा टोकाचा निर्णय का घेतला? या कारणांचा शोध पोलीस घेत आहे. का मुलांच्या, मुलीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली? याचाही तपास आता लातूर पोलीस करत असल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सांगितले.

Web Title: MBBS student commits suicide incident in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर