वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्या कारखान्याचीही फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:16+5:302021-09-02T04:44:16+5:30
जिल्ह्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याकडून २०१८-१९च्या गाळपाची काही साखर निर्यातीसाठी चेन्नई येथील कुरुंजी प्रो. नॅचरल फूड्स प्रा. ...
जिल्ह्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याकडून २०१८-१९च्या गाळपाची काही साखर निर्यातीसाठी चेन्नई येथील कुरुंजी प्रो. नॅचरल फूड्स प्रा. लि. कंपनीने खरेदी केली होती. त्यानंतर कारखान्याकडून निर्यातीचे पुरावे मागितले असता प्रतिसाद दिला नाही. ती साखर निर्यात न करता खुल्या बाजारात विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात कंपनीचे चेअरमन मनिकांत ऊर्फ मुनिकृष्ण, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राज, मध्यस्थ अभिजित वसंतराव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, तर किनगाव पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल होत असून, तपासासाठी नांदेडहून एक आरोपी आणला जात आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बुधवारी सांगितले.
दरम्यान, मुरूड पोलिसांनी मध्यस्थाला ताब्यात घेतले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी बुधवारी सांगितले.