रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलतर्फे कवयित्रींचे संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:12 AM2021-02-19T04:12:19+5:302021-02-19T04:12:19+5:30
या वेळी कोरोनाचे संकट, बाळाची चाहूल, आई, पक्ष्यांची व्यथा, सीरियलचे साइड इफेक्ट, संक्रांतीचे वाण, गुलाबी गारवा, जगणे कसे असावे, ...
या वेळी कोरोनाचे संकट, बाळाची चाहूल, आई, पक्ष्यांची व्यथा, सीरियलचे साइड इफेक्ट, संक्रांतीचे वाण, गुलाबी गारवा, जगणे कसे असावे, अशा अनेक कविता सादर करण्यात आल्या. साहित्यिक सखी ग्रुप हा भारतच नव्हे तर भारताबाहेरही असून तो १५० लेखिकांचा ग्रुप आहे. त्यात साहित्यिक सखी ग्रुप नवनवीन उपक्रम सातत्याने राबवत आहे. याच लेखिकांची आणि नवीन उपक्रमांची दखल घेत रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलने हा उपक्रम घेतला. प्रास्ताविक ज्योती डोळे यांनी केले. स्वागतगीत उषाताई तोंडचिरकर यांनी सादर केले. संचलन अश्विनी निवर्गी यांनी केले. या वेळी साहित्यिक सखी ग्रुपच्या अर्चना नळगीरकर, सुनंदा सरदार, अनिता संकाये, प्रीती दुरुगकर, राचम्मा मळभागे, मंगला शेटे बिरादार, छाया दीक्षित, सुरेखा कुलकर्णी, माधुरी स्वर्गे, अमृता दीक्षित, ज्योती डोळे आदींची उपस्थिती होती. या सर्व प्रतिनिधींना सन्मानपत्र देऊन भूषवण्यात आले. यासाठी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष विशाल तोंडचिरकर, सचिव कीर्ती कांबळे, विद्या पांढरे, महानंदा सोनटक्के, सुनीता लोहारे, मंगला विश्वनाथे, विशाल जैन, ज्योती चौधरी, सपना जैन, मयुरी मधवरे, रिचा खत्री, मीरा चंबुले, सुप्रिया महाजन, सुप्रिया तोंडचिरकर आदींनी पुुढाकार घेतला.