मध्यरात्री कत्तलखान्यातवर धाड; पशुधनांची केली सुटका, दाेघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: August 10, 2023 01:55 PM2023-08-10T13:55:36+5:302023-08-10T13:55:42+5:30
पाेलिसांनी हाळी हंडरगुळी येथील कत्तलखान्यावरच अचानकपणे सापळा लावून छापा मारला.
लातूर : रात्रीच्या काळाेखात कत्तलखान्यात पशुधनांची कत्तल करण्याच्या तयारीत असलेल्या दाेघांना अटक केल्याची घटना हाळी हंडरगुळी (ता. उदगीर) येथे गुरुवारी पहाटे घडली. यावेळी दाेन पुशधनांची पाेलिसांनी सुटका केली. याबाबत वाढवणा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे लाकडी मीलच्या बाजूला असलेल्या कत्तलखान्यात पशुधनांची कत्तल केली जात असल्याची माहिती खबऱ्याने रात्रीच्या वेळी वाढवणा पाेलिसांना दिली. दरम्यान, याच भागात पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या असलेल्या पाेलिसांनी हाळी हंडरगुळी येथील कत्तलखान्यावरच अचानकपणे सापळा लावून छापा मारला. यावेळी कत्तलखान्याची झाडाझडती घेतली असता, दाेन पशुधन आढळून आले. दरम्यान, कत्तलच्या तयारीत असलेल्या दाेघांना पाच सुरी, चार कुऱ्हाडी, लाेखंडी पाते अशा साहित्यासह अटक केली. अधिक चाैकशी केली असता, ईस्माईल इसाकसाब कुरेशी (४३, रा. हाळी), पाशा गफुरसाब कुरेशी (५० रा. हंडरगुळी ता. उदगीर) अशी त्यांनी नावे सांगितली. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात पाेलिस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.