दुष्काळ जाहीर करण्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन
By संदीप शिंदे | Published: September 1, 2023 05:43 PM2023-09-01T17:43:37+5:302023-09-01T17:43:37+5:30
रेणापूर तहसील कार्यालयसमोरील रास्ता रोकोने वाहतूक ठप्प
लातूर : रेणापूर तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड असून, शेतातील पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेणापूर तहसील कार्यालयसमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मनसेचे संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी एकतास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदत द्यावी, सर्व महसूल मंडळात २५ टक्के ॲग्रीम पिकविमा लागू करावा, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपोटी ५० हजारांची मदत करावी व संरक्षणासाठी अनुदान द्यावे, बोगस बियाणाची चौकशी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आली. आंदोलनात शेतकरी, मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.