लातूर महापालिकेच्या विरोधात मनसेचे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा केले निषेध
By संदीप शिंदे | Published: September 19, 2022 03:58 PM2022-09-19T15:58:49+5:302022-09-19T15:59:09+5:30
शहरातील श्री देशीकेंद्र शाळेजवळ रस्त्याच्या तोडफोडीविरोधात आंदोलन
लातूर : शहरातील श्री देशीकेंद्र शाळेजवळील उड्डाणपुलाचे नुतणीकरण करण्यात येत आहे. मात्र, या कामामुळे चांगल्या रस्त्याची तोडफोड होत असून, याला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी उड्डाणपुल परिसरात आंदोलन करण्यात आले.
शहरातील श्री देशीकेंद्र शाळेजवळ उड्डाणपुल असून, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला होता. आता सध्या उड्डाणपुलाचे नूतनीकरण करीत असल्याचे सांगण्यात येत असून, या कामामुळे चांगल्या रस्त्याचीही तोडफोड करण्यात येत असल्याचा आरोप करीत मनसेच्या वतीने सोमवारी उड्डाणपुलावर शहराध्यक्ष मनोज अभंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले. आंदोलनात कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, अर्जुन कोळी, वैभव जाधव, अनिल जाधव, परमेश्वर पवार, अजिंक्य मोरे, बालाजी पाटील, जहाॕगीर शेख, दत्ता म्हेत्रे, सचिन पांचाळ, कुणाल यादव, गोविंद उदगीरे, गहिनीनाथ सोमवंशी, विशाल बडे, सिध्दु इरळे, तुकाराम कांबळे, ओमकार शिंदे, महेश क्षिरसागर, धिरज राऊत, विवेक खोबरे, राहुल राठोड, किशन धुमाळ, गोविंद मुगळे, विश्वनाथ उदगीरे, किरण इंगळे, पिंटु पवार, शिवराज सलगर, आकाश मस्के, पवन थोरात, सुनिल शिंदे आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.