मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:40+5:302021-07-07T04:24:40+5:30
असे का होते? तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे. बुद्धिमत्तेला चालना न देता थेट ...
असे का होते?
तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे.
बुद्धिमत्तेला चालना न देता थेट यंत्रावर सर्व गोष्टी होत आहेत. त्या यंत्रावर मिळू शकतात. त्यामुळे आठवणीत ठेवण्याची गरज भासत नाही.
बुद्धिमत्ता खालावत चालल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी आठवत नाहीत. याला टेक्नॉलॉजी कारणीभूत आहे.
हे टाळण्यासाठी
जाणीवपूर्वक बुद्धीला चालना दिली पाहिजे. जे आपण काम करतो, ते काम मेंदूमध्ये स्टोरेज होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
मल्टी टास्किंग न करता एकाच वेळी एक काम हाती घेऊन ते पूर्ण करणे हेच उद्दिष्ट असायला हवे.
बुद्धीला चालना देण्यासाठी नवीन गोष्टी शिकली पाहिजेत. नवीन खेळ, नवीन भाषा शिकून ही चालना देता येईल.
मुलांना, आजोबांना नंबर्स पाठ, कारण
आजोबा
मोबाईलचा वापर करीत नसल्यामुळे घरातील वयस्क व्यक्तींना सगळ्यांचेच मोबाईल नंबर पाठ आहेत. जुने माणसं एकाच वेळी अनेक कामं करीत नाहीत. त्यामुळे त्यांना नंबर पाठ आहेत.
आई
गृहिणी असलेल्या आईला घरातल्या सगळ्याच सदस्यांचे मोबाईल नंबर्स तोंडपाठ आजही आहेत. कारण आईकडून मोबाईलचा वापर सर्रास नाही. तिचे काम एकाग्रतेवर आहे.
लहान मुलगा
लहान मुलांनाही आई, बाबा व घरातील भावंडांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यांचीही एकाग्रता कमालीची असते. त्यामुळे दहावीच्या आतील वयोगटात अनेक मुलांना नंबर मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत.
मल्टी टास्किंगमुळे बुद्धिमत्ता खालावत चालली आहे. पण आजही एकाच वेळी एक काम एकाग्रतेने केले तर सर्व गोष्टी ध्यानात राहू शकतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. - डॉ. आशिष चेपुरे, डॉ. अपूर्वा