गुढ्यात दुसऱ्या दिवशीही माकडाची अंत्ययात्रा
By Admin | Published: July 5, 2016 06:51 PM2016-07-05T18:51:07+5:302016-07-05T18:51:07+5:30
सलग दुसऱ्या दिवशी माकडाची अंत्ययात्रा येथे निघाली. हा योगायोग मात्र परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी दुपारी येथे बापू वाणी यांच्या शेतात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका माकडाचा जागीच मृत्यू झाला
ऑनलाइन लोकमत
गुढे, दि. ५ : सलग दुसऱ्या दिवशी माकडाची अंत्ययात्रा येथे निघाली. हा योगायोग मात्र परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
सोमवारी दुपारी येथे बापू वाणी यांच्या शेतात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका माकडाचा जागीच मृत्यू झाला होता. या माकडाची वाजतगाजत अंत्ययात्रा काढण्यात आली होती.४ रोजीच श्रीकृष्ण मंदिर परिसरात एका झाडावरुन मादी माकड खाली पडले असता वीज तारांचा स्पर्श झाल्याने ते जखमी झाले.
तरुणांनी त्यास पशूवैद्यकीय दवाखान्यात नेले, तेथे उपचार न झाल्याने त्यावर बहाळ येथील खासगी डॉक्टरकडून उपचार केले. यानंतर वनविभाग कर्मचारी रात्री या माकडास चाळीसगाव येथे उपचारार्थ नेताना या माकडाचा वाटेतच मृत्यू झाला. ५ रोजी या माकडाचीही वाजतगाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. राममंदिर चौक व हनुमान मंदीरात आरती करण्यात आली. गुढे फाट्याजवळील शेतात या माकडाला बुजवण्यात आले.दोन्ही माकडाचा दशक्रिया विधी ७ रोजी राममंदिर चौकात होणार आहे. दरम्यान राममंदिर चौकातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.