पाेलीस कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:24+5:302021-01-09T04:16:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले हाेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याविराेधात डाॅक्टरांनी आवाज उठवून शासनाला कायदा ...

Most attacks on revenue employees including Paelis employees! | पाेलीस कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले !

पाेलीस कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले हाेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याविराेधात डाॅक्टरांनी आवाज उठवून शासनाला कायदा करण्यास भाग पाडले. यंदा मात्र, लातूर जिल्ह्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पाेलिसांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. त्याखालाेखाल महसूल विभाग टार्गेट राहिले आहे.

गत वर्षभरात लातूर जिल्ह्यात विविध विभागांतील ५४ कर्मचाऱ्यांना जनतेचा राेष पत्करावा लागला आहे, नव्हे मार खावा लागला. पाेलीस दलातील २३ कर्मचाऱ्यांना या हल्ल्याची झळ बसली आहे. तर महसूल विभागातील १४ कर्मचाऱ्यांनी हल्ले पचविले आहेत. महावितरणच्या ९ कर्मचाऱ्यांवरही हल्ला झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रांतील ७ जणांना तर नगर परिषदेतील ३ कर्मचाऱ्यांवरही हल्ला झाल्याची घटना घडली. जिल्हा परिषद आणि एस. टी. महामंडळातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला हल्ल्याला सामाेरे जावे लागले आहे. दरम्यान, लातूर १७, औसा १०, अहमदपूर ७, रेणापूर २, उदगीर ६, शिरुर अनंतपाळ १, देवणी २, चाकूर ५, जळकाेट ३ अशा एकूण ५४ जणांवर हल्ला झाल्याची नाेंद पाेलीसदप्तरी आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल

जानेवारी ते डिसेंबरअखेर एकूण २३ पाेलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असून, त्यापाठाेपाठ महसूल, आराेग्य आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हल्ल्याची झळ सहन करावी लागली आहे. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

पाेलीस दलातील कर्मचारी झाले लक्ष्य...

जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर लातूर जिल्ह्यातील २३ पाेलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला आहे. त्यापाठाेपाठ महसूल विभागातील १४ जणांना हल्ल्यांना सामाेरे जावे लागले. तर महावितरणमधील ९ कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’ करण्यात आले आहे.

Web Title: Most attacks on revenue employees including Paelis employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.