शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर; पुरवठा विभागात गती  

By आशपाक पठाण | Published: July 30, 2023 06:26 PM2023-07-30T18:26:09+5:302023-07-30T18:26:16+5:30

लातूर जिल्ह्यात धान्याऐवजी थेट पैशाच्या लाभाचे ५२ हजार ९४८ कार्डधारक आहेत.

Mountain of difficulty in paying farmers card holders Speed in the supply department | शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर; पुरवठा विभागात गती  

शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर; पुरवठा विभागात गती  

googlenewsNext

लातूर: राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील लाभार्थीना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यात आल्यानंतर त्यांना धान्याऐवजी लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. योजनेला प्रारंभ होऊन सात महिने लोटले तरी माहिती संकलनातील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. जिल्ह्यात केवळ ५८.८९ टक्के लाभार्थ्यांची माहिती संकलित झाली आहे. इतर लाभार्थी अजूनही रेशन दुकानदारांकडे फिरकले नाहीत. त्यामुळे निधी वाटपात दिरंगाई होत आहे.

लातूर जिल्ह्यात धान्याऐवजी थेट पैशाच्या लाभाचे ५२ हजार ९४८ कार्डधारक आहेत. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे रेशनकार्डवरील लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक, महिला कुटुंब प्रमुखांचा बँक अकाऊंट नंबर, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कुटुंबात महिलांच्या नावे खाते उघडण्यात आले नाहीत. बँकेत खाते काढण्यासाठी पॅनकार्ड लागते. यातच एखाद्या बँकेच्या अधिकाऱ्याने कागदपत्रे मागितली की, पुन्हा तिकडे कोणी फिरकत नाही. दुकानदारांनी तहसील कार्यालयात जमा केलेली कागदपत्रे भरण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याने लाभ देण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगितले जात आहे.

जानेवारीपासून मिळणार लाभ...
जानेवारी २०२३ पासून लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रती सदस्य १५० रूपये महिन्याला लाभ मिळणार आहे. यासाठी स्थानिक स्वस्त धान्य दुकानदारांकडे कागदपत्रे देणे गरजेचे आहे. मात्र, लाभार्थीच कागदपत्रांची पुर्तता करीत नसल्याने योजनेचा लाभ द्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसील स्तरावर आलेल्या लाभार्थ्यांची डाटा एन्ट्री करण्याचे काम काही ठिकाणी प्रगतीपथावर असले तरी जिथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, तिथे मात्र ओरड आहे.

५८.८९ टक्के लाभार्थ्यांची डाटा एन्ट्री...
लातूर जिल्ह्यात असलेल्या ५२ हजार ९४८ लाभार्थ्यांपैकी ३६ हजार ६४३ जणांनी अर्ज भरून दिले आहेत. यातील ३१ हजार ६६७ जणांची डाटा एन्ट्री पूर्ण झाली आहे. डाटा एन्ट्रीचे काम ५८.८९ टक्के झाले असून अर्ज येण्याचे प्रमाण ६८.२९ टक्के आहे. तहसीलस्तरावर एन्ट्री केली जात असून पहिल्यांदा जिल्हा पुरवठा कार्यालयातून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार असल्याने लाभार्थ्यांची अर्जाची पडताळणी केली जात आहे.

निलंगा, औसा तालुक्याची आघाडी...
तालुका, लाभार्थी दाखल अर्ज, डाटा एन्ट्री,टक्केवारी

  • लातूर   ६३८८  ३२८० ३२८० ५१.३५
  • औसा   ९३२६           ७५५० ५४२० ५८.१२
  • रेणापूर  ५५५७       ३४२६ २१४४ ३८.५८
  • निलंगा  १०५१२  ८८९१     ८५६७  ८१.५०
  • शि.अनंतपाळ २९१७ २३४९            २०४७  ७०.१७
  • अहमदपूर ५८९०            ३६५०            ३५०० ५९.४२
  • चाकूर ५३८२            ३८९४        ३८२५  ७१.०७
  • देवणी २६८९  १२६९          १२१० ४५.००
  • उदगीर २५५७         १२५९            ११५४ ४५.१३
  • जळकोट १७३०          १०७५           ५२०  ३०.०६

खाते काढण्यासाठी बँकांना सूचना...
लाभार्थी कुटुंबातील महिला कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर लाभ मिळणार आहे. ज्यांचे बँकेत खाते नाही, त्यांनी तात्काळ खाते काढून घ्यावेत. बँकांनी लाभार्थ्यांची खाते काढण्यात दिरंगाई करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना खाते नंबर, कार्डची प्रत जोडून अर्ज भरून द्यावा, डाटा एन्ट्री पूर्ण होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाईल. - प्रियंका कांबळे-आयरे, जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर

Web Title: Mountain of difficulty in paying farmers card holders Speed in the supply department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.