बंद केलेले कोविड सेंटर गरजेनुसार पुन्हा चालू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:39+5:302021-02-24T04:21:39+5:30
गेल्या सात दिवसांमध्ये २६५ रुग्ण आढळले आहेत. १६ फेब्रुवारीला ३१, १७ रोजी ३५, १८ रोजी ४८, १९ रोजी २६, ...
गेल्या सात दिवसांमध्ये २६५ रुग्ण आढळले आहेत. १६ फेब्रुवारीला ३१, १७ रोजी ३५, १८ रोजी ४८, १९ रोजी २६, २० फेब्रुवारीला ४४, २१ रोजी ३५ आणि २२ फेब्रुवारी रोजी ४६ रुग्ण आढळलेले आहेत. या सात दिवसांत २६५ रुग्ण आढळले असून, या सात दिवसांत केलेल्या चाचण्यातील पॉझिटिव्हिटी रेट २.३ ते ३.५ च्या आसपास राहिला आहे.
जिल्ह्यात १७ कोविड केअर सेंटर होती. रुग्णसंख्या घटल्यामुळे सध्या एकच कोविड केअर सेंटर सुरू आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या नगण्या आहे. जे रुग्ण सापडत आहेत, ते महानगरपालिका क्षेत्रात आहेत. त्यासाठी शहरात मोठे कोविड केअर सेंटर आहे. गरजेनुसार कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश शासनाचे आहेत. सध्या तर गरज नाही. रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी