महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:47+5:302021-05-19T04:19:47+5:30

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात उदगीर व जळकोट तालुक्यातील महावितरण कामांची आढावा बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार ...

MSEDCL Deputy Executive Engineer should be suspended | महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करावे

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करावे

Next

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात उदगीर व जळकोट तालुक्यातील महावितरण कामांची आढावा बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेंगेटोल, श्याम डावळे, समीर शेख, तहसीलदार रामेश्वर गोरे, कार्यकारी अभियंता मठपती यांच्यासह अभियंत्यांची उपस्थिती होती.

येणकीचे उपसभापती रामराव बिरादार, कौळखेडचे चंदरअण्णा पाटील यांनी येणकी व कौळखेड परिसरात सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. कल्याण पाटील व श्याम डावळे यांनी हाळी-हंडरगुळी व वाढवणा (बु.) परिसरात विजेच्या लपंडावाची माहिती दिली. देवर्जन येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील फिडर वरचा भार कमी करून शेजारच्या उपकेंद्रास जोडण्यात यावा, अशी मागणी युवराज धोतरे यांनी केली. व्ही.एस. कुलकर्णी यांनी देवर्जन येथे महावितरणचे युनिट कार्यालय तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व विजेच्या वाहिन्यांची दुरुस्ती, किटकॅट, केबल सर्व ट्रान्सफार्म बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी उपस्थितांनी केली. अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी महावितरणच्या सर्व अभियंत्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज वाहिन्यांची कामे करून घेण्याची सूचना केली. गरज असेल, त्या ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतही अधीक्षक अभियंता भोळे यांनी संबंधिताना सूचना केल्या. कामात हयगय व निष्काळजीपणा करीत असल्याच्या कारणावरून उदगीर येथील महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कटकधोंड यांना निलंबित करण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.

कॅप्शन : उदगीरात महावितरण कामाच्या आढावा बैठकीत बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे. यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटुरे, कल्याण पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, चंद्रकांत टेंगेटोल.

Web Title: MSEDCL Deputy Executive Engineer should be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.