शाळकरी मुलाचा खून; अल्पवयीन मुलासह आई-वडिलांविराेधात गुन्हा, एक ताब्यात : विळ्याने वार करून संपविले
By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2025 21:56 IST2025-01-13T21:56:38+5:302025-01-13T21:56:47+5:30
दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला.

शाळकरी मुलाचा खून; अल्पवयीन मुलासह आई-वडिलांविराेधात गुन्हा, एक ताब्यात : विळ्याने वार करून संपविले
राजकुमार जाेंधळे / लातूर : दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला. याप्रकरणी भादा पाेलिस ठाण्यात दाेन अल्पवयीन मुलांसह एकाचे आई-वडील तर अन्य एकाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मयत रितेशचे वडील वीरेंद्र पाेपट गिरी (वय ३८, रा. कमालपूर, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मुलगा रितेश यास ११ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता त्याच्या दाेन मित्रांनी घराबाहेर बाेलावले हाेते. रात्री ९ वाजले तरी रितेश घराकडे आला नाही. त्यामुळे साेबतच्या मित्रांकडे कुटुंबीयांनी विचारणा केली असता, ताे तेव्हाच निघून गेला असे उत्तर मिळाले. त्यानंतर १२ जानेवारी राेजी पहाटेपासून रितेशच्या कुटुंबीयांनी पुन्हा शाेध सुरू केला. रितेशसाेबत गेलेल्या मित्रापैकी एकाला पुन्हा विचारणा केली. त्यावेळी उडवाडवीची उत्तरे मिळाली. विश्वासात घेतल्यानंतर त्याने गावातील नारळ बागेतील नारळ खाण्यासाठी विळा घेऊन आम्ही गेलाे हाेताे, असे सांगितले. तेथे नारळे खाली काढून आम्ही खाल्ली. परत येताना वाटेत गुन्ह्यात सामील अल्पवयीन मुलगा आणि रितेश यांच्यात वाद झाला. हातात असलेल्या विळ्याने गळ्यावर, डाेक्यात आणि पाेटावर वार करून ठार केले. त्यानंतर वाटेतील त्याच शेतात साेयाबीनच्या गुळीमध्ये टाकून त्यावर गुळी टाकली. ही माहिती मिळाल्यानंतर मयत रितेशच्या आई-वडिलांनी शेतात जाऊन पाहिले असता, विवस्त्र अवस्थेत गुळीच्या मध्ये मृतदेह आढळला.
रितेशला ज्या दाेन मुलांनी संगनमताने मारले त्यांच्यापैकी एकाचे आई-वडील आणि दुसऱ्याचे वडील यांनीही मृतदेहावर गुळी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आराेप फिर्यादीत नमूद आहे. त्याबाबत अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांवर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.