लातुरात जेवणाच्या निमंत्रणावरून तरुणाचा भाेसकून खून; पोलिसांनी १८ आराेपींना राताेरात उचलले 

By राजकुमार जोंधळे | Published: May 10, 2023 07:48 PM2023-05-10T19:48:15+5:302023-05-10T19:48:24+5:30

खूनप्रकरणी एकूण २९ पैकी १८ जणांना ताब्यात घेतले असून, अद्याप ११ जण फरार आहेत.

murder of a young man in Latur; Police picked up 18 accused overnight | लातुरात जेवणाच्या निमंत्रणावरून तरुणाचा भाेसकून खून; पोलिसांनी १८ आराेपींना राताेरात उचलले 

लातुरात जेवणाच्या निमंत्रणावरून तरुणाचा भाेसकून खून; पोलिसांनी १८ आराेपींना राताेरात उचलले 

googlenewsNext

लातूर : जेवणाच्या निमंत्रणावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा भाेसकून खून केल्याची घटना साेमवारी रात्री घडली हाेती. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणाहून १८ जणांना उचलले असून, त्यांना बुधवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, हरजितसिंग सिसपालसिंग टाक (वय ३५) यांचे लातूरच्या म्हाडा काॅलनीत घर आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इब्राहिम शेख यांचेही घर असून, त्यांच्या घरी कार्यक्रम हाेता. साेमवारी रात्री कार्यक्रमाच्या जेवणाचे निमंत्रण देण्यात आले हाेते. या निमंत्रणावेळी दाेघांत बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाल्याने शेख याने इतर काही लाेकांना एकत्र केले. हे सर्व टाक यांच्या घरावर चाल करून गेले. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या छबूबाबई यांच्या घरात घुसून हरजितसिंग सिसपालसिंग टाक यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. यात टाक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पत्नीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात सद्दाम मुस्ताक फारुकी, अंजुम सद्दाम फारुकी, इब्राहिम उर्फ मुन्ना निसार शेख, पाशा निसार शेख, दयानंद नारायण कांबळे, गैबीसाब दगडू शेख, युनूस गुलाब शेख, माेहीन अकबर चाैधरी, महेबूब ईस्माईल शेख, सलीम चाँदपाशा शेख, इम्रान शेख, असलम दगडू शेख, जावेद अब्दुल मजीद सय्यद, अरबाज महेबूब शेख, बबलू महेबूब शेख, शाेयब सलीम शेख, हलीम सलीम शेख, हलीम उर्फ अमन शेख, प्रवीण प्रताप चाेथवे, साेहेल युनूस पठाण यांच्यासह इतर अनाेळखी (सर्व रा. लातूर) एकूण २९ जणांविराेधात गुन्हा दाखल केला. यातील १८ जणांना पाेलिसांनी उचलले असून, त्यांना बुधवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सात दिवसांची काेठडी सुनावली आहे.

फरार झालेल्या ११ आराेपींचा शाेध सुरू...
खूनप्रकरणी एकूण २९ पैकी १८ जणांना ताब्यात घेतले असून, अद्याप ११ जण फरार आहेत. त्यांच्या शाेधासाठी पाेलिस पथके तैनात आहेत. अटकेची कारवाई पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पाेलिस निरीक्षक एच. आर. केदार, पाेलिस उपनिरीक्षक बालाजी गाेणारकर, उदय सावंत, हाजी सय्यद, ज्ञानाेबा देवकत्ते, पाेलिस अंमलदार दयानंद साराेळे, मुन्ना पठाण, सुधीर साळुंके, मुन्ना नलवाड, संजय बेरळीकर, अंबादास पारगावे, पांडुरंग गाेगणे, वाजिद चिकले, माजिद जहागीरदार, महेबुब शेख यांच्या पथकाने केली.

Web Title: murder of a young man in Latur; Police picked up 18 accused overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.